Weather Report : पारा घटला, अवकाळीचा धोका मात्र वाढला, 2 दिवस कसे राहणार हवामान?

उन्हाळ्याला सुरवात होताच उत्तर महाराष्ट्रात मात्र, अवकाळीने हजेरी लावली होती. त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता परस्थिती बदलली असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे जळगाव, नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगरमध्ये उन्हाच्या झळा ह्या वाढणारच असल्याचा अंदाज आहे. सोमवारी चंद्रपूरात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

Weather Report : पारा घटला, अवकाळीचा धोका मात्र वाढला, 2 दिवस कसे राहणार हवामान?
मान्सूनला भारतामध्येच नव्हे तर अशिया खंडात अनन्यसाधारण महत्व आहे.
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 2:11 PM

पुणे : यंदाच्या (Summer Season) उन्हाळ्यात राज्यात समसमान तापमान स्थिती अशी परस्थितीच निर्माण झाली नाही. कायम निसर्गाचा लहरीपणान अनुभवयास मिळाला आहे.उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस सुरु असताना मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या होत्या. आता राज्यात (Temperature) तापमानाचा पारा घटला असला तरी उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. तर (Marathwada) मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या काही भागात वाढते तापमान तर दुसरीकडे पावसाचा अंदाज अशी स्थिती निर्माण झाली आहे. सबंध उन्हाळा संपत आला तरी ऊन-पावसाचा खेळ काही संपला नाही.

उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम

उन्हाळ्याला सुरवात होताच उत्तर महाराष्ट्रात मात्र, अवकाळीने हजेरी लावली होती. त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता परस्थिती बदलली असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे जळगाव, नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगरमध्ये उन्हाच्या झळा ह्या वाढणारच असल्याचा अंदाज आहे. सोमवारी चंद्रपूरात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. विदर्भातही पारा 44 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. असे असले तरी मागील आठवड्याच्या तुलनेत तापमानात झालेली घट ही सर्वसामान्यांसाठी समाधानकारक आहे.

मराठवाड्यासह पश्चिम महाष्ट्रात पावसाच्या सरी

उत्तर महाराष्ट्र उन्हामध्ये होरपळत असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळीची अवकृपा ही राहणारच आहे. 4 मे रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिगोली, नांदेड, लातू, उस्मानाबाद आदी भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर विजेच्या कडकडाटात पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

गतआठवड्यापेक्षा पारा घटला

विभागानिहाय तापमानात बदल असला तरी गतआठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. सध्या सरासरीपेक्षा अधिकचे तापमान असले तरी चालू आठवड्यात हा टक्का कमी झाला आहे. यामुळे दिलासा मिळाला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यात धग ही कायम आहे. मराठवाड्यात परभणी, नांदेडचे तापमान हे 43 अंश सेल्सिअस एवढे होते. अशीच परस्थिती पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणीही निर्माण झाली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.