तांत्रिक बिघाडासह खराब हवामानामुळं शिर्डीला जाणार विमान थेट उतरलं मुंबई विमान तळावर; प्रवाशाना नाहक त्रास
स्पाईस जेट चे विमान विमान तांत्रिक बिघाडीमुळे शिर्डी ऐवजी मुंबईला उतरवण्यात आले आहे.
मुंबई : दिल्लीहून शिर्डीसाठी (Shirdi) जाणारे स्पाइस जेटचे विमान तांत्रिक बिघाडीमुळे आज गुरूवारी (दि. 19) थेट मुंबई विमानतळावर उतरण्यात आले. तर तांत्रिक बिघाडी या कारणामुळेच नाही तर खराब हवामानामुळेही विमान शिर्डी विमानतळाऐवजी (Shirdi Airport) मुंबईत उतरण्यात आलं आहे. या निर्णयामुळे दिल्लीहून शिर्डी जाणारे तसेच श्री साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान यानंतर या प्रवासात प्रवाशांना नाहक पाच तास विमानात बसून राहावे लागले. तर त्या प्रवाशांना मुंबई विमान (Mumbai Airport)तळावर कोणतेही सुविधा देण्यात आली नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला आहे. मात्र स्पाईस जेटच्या व्यवस्थापनाकडून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बसची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. याचा फटका आता थेट विमान प्रवासाला बसला. आज दिल्लीहून शिर्डीसाठी जाणारे स्पाईस जेटचे विमान (SG-953)थेट मुंबईला उतरविण्यात आले. तर यामागे तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे शिर्डीऐवजी मुंबईत विमान उतरण्यात आल्याचे स्पाईस जेटच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे मात्र प्रवाशांना नाहक त्रास सहन कारावा लागला आहे. तसेच आधी ठरल्याप्रमाणे विमान हे शिर्डी विमान तळाकडेच गेले होते. तेथे लॅडींगसाठी विमानाने दोन घीरट्या ही घेतल्या मात्र खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे तेथे विमान उतरले नाही. ते थेट मुंबईकडे आले. यामुळे मात्र प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी प्रवाशांनी कारण विचारल्यास त्यांना खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडाचे कारण सांगण्यात आले.
दरम्यान यानंतर या प्रवासात प्रवाशांना नाहक पाच तास विमानात बसून राहावे लागले. तर त्या प्रवाशांना विमान तळावर कोणतेही सुविधा देण्यात आली नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला आहे. मात्र स्पाईस जेटच्या व्यवस्थापनाकडून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बसची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तर दरम्यान गेल्याही वर्षी चेन्नई येथून शिर्डीसाठी आलेले स्पाइस जेटचे विमान शिर्डी विमानतळावर कमी दृष्यमानतेच्या कारणास्तव थेट मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले होते. त्यावेळीही त्या निर्णयामुळे चेन्नईहून येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. कमी दृश्यमानतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे व्यवस्थापक सुशील कुमार श्रीवास्तव यांनी दिली होती.