मुसळधार पावसाने दाणादाण, हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी मोठ्या संकटात

Crop Loss in Maharashtra : मुसळधार पावसाने राज्यात हाहाकार उडवला आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे उभी पीकं आडवी झाली. तर काही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

मुसळधार पावसाने दाणादाण, हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी मोठ्या संकटात
मुसळधार पावसाने मोठे नुकसान
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 11:54 AM

मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली. गेल्या तीन दिवसांपासून काही भागात कोसळधार सुरू आहे. या परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. उभी पीकं आडवी झाली आहेत. तर काही पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

लाखो रुपयांच्या पपईवर रोगाचा प्रादुर्भाव

नांदेड जिल्ह्यात सततच्या पाऊसामुळे पपई पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होत आहे. मुदखेड तालुक्यातील पपईच्या बागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सलग गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने पपई पिकावर रोंगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपईची उगवन क्षमता कमी झाली. पपई पिकत नसल्याने पपई बागेचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेकडो एकरवरील पपईच्या बांगा संकटात आल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्याचा फटका पपई पिकाला बसला आहे.

हे सुद्धा वाचा

कपाशी पीक झाले जमीन दोस्त

जळगाव जिल्ह्यासह रावेर तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापूस, मका, ज्वारी, तूर या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पीक जमीनदोस्त झाले. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरवला गेला. दरम्यान तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

केळीची झाडं कोलमडली

जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पावसामुळे चिंचोली उमाळा परिसरात एका शेतातील 1 हजार केळीचे झाडे कोलमडून पडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. सलग दोन दिवस आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे काढणी, मळणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसला. जळगाव तालुक्यातील धानवड , उमाळा चिंचोली तसेच विटनेर, जळके या परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते आहे मुक्ताईनगर व चोपडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून मेघ गर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस तूर उडीद मूग मका या पिकांना मोठा फटका बसला आहे

कपाशी, मका भाजीपाल्याचे नुकसान

गेल्या दोन दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये विविध भागात परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केलं आहे विशेषता धुळे तालुक्यामध्ये कापडणे देवभाने न्याहाळत दमाने या शिवारातल्या शेतीचे मोठे नुकसान झाला असून मका या पिकाच मोठ नुकसान झाला आहे. कपाशी, मका भाजीपाला याचे नुकसान झाले. काढलेला मका पाण्याने भिजला. शेतकऱ्याचा सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

परतीच्या पावसाने दाणादाण

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसा नगरमध्ये काल रात्री मुसळधार पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे. त्यामूळे हात तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुसकान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. पारतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या हलक्या स्वरूपाच्या धान पिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.