Parbhani Oxygen Demand | आता परभणीत प्रतितास 80 हजार लिटर ऑक्सिजनची निर्मिती, 2 दिवसांत प्रकल्प सुरु होणार
परभणी जिल्ह्यातसुद्धा रुग्णांवर उपचार करण्यासाठी कृत्रिम ऑक्सिजन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. (parbhani corona patient oxygen generation)
परभणी : राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण रोज वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा सर्व भागात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. रोज रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. आरोग्य यंत्रणा कमी पडल्यामुळे उपचाराअभावी आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा तर जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये भासत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी कृत्रिम ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून वाढत्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन भेटावा यासाठी कसोसीने प्रयत्न सुरु आहेत. परभणी जिल्ह्यातसुद्धा रुग्णांवर उपचार करण्यासाठी कृत्रिम ऑक्सिजन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यासह बीड, नांदेड अशा जवळच्या जिल्ह्यांना आपत्कालीन काळात ऑक्सिजन मिळू शकेल. (due to increase in Corona patient Oxygen generation project will establish in Parbhani)
आमदार राहूल पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीसुद्धा वाढत आहे. या अनुषंगाने परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परभणी येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी परळी थर्मल येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प परभणी येथे स्थलांतरित करण्याचे आदेश मुख्य सचिवांमार्फत विभागीय आयुक्तांना दिले. त्यामुळे या आदेशानंतर आता परभणी येथील जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत येत्या दोन दिवसात नवा ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
सध्या परभणी MIDC परिसरात खाजगी तत्त्वावर उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प अस्तित्वात असून त्याद्वारे जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोवीड सेंटर्सना ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्यात येत आहेत. जिल्ह्याला दररोज 25 KL क्षमतेच्या ऑक्सिजनची गरज भासत आहे. ४/५
— Dr. Rahul Patil (@MLA_RahulPatil) April 18, 2021
नव्याने कार्यान्वित होणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून 80,000 लिटर प्रतितास एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन साठ्याची कमतरता भासणार नाही व रुग्णांना तातडीने सुविधा उपलब्ध होईल. ५/५
— Dr. Rahul Patil (@MLA_RahulPatil) April 18, 2021
सध्या खासगी तत्वावर ऑक्सिजन निर्मिती
सध्या परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी परभणी खासगी तत्वावर ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत आहे. सध्या MIDC परिसरात ऑक्सिजन प्रकल्प खासगी तत्वावर उभारण्यात आलेला आहे. याद्वारे जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी कोविड सेंटर्सना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यात येत आहेत.
80,000 लिटर प्रतितास क्षमतेने ऑक्सिजनची निर्मिती होणार
सध्या परभणी जिल्ह्याला दररोज 25 KL क्षमतेच्या ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुले नव्याने कार्यान्वित होणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून 80,000 लिटर प्रतितास एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन साठ्याची कमतरता भासणार नाही तसेच रुग्णांना तातडीने ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होईल, असे आमदार राहुल पाटील यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रासाठी रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा
दरम्यान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने लिक्वीड ऑक्सिजनसाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. या दोन्ही राज्यांनी रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या वाहतुकीबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सोमवारपासून (19 एप्रिल) महाराष्ट्रातून ऑक्सिजनचे खुले टँकर्स रेल्वेमार्गाने विजाग, जमशेदपूर, राऊरकेला, बोकारो येथे पोहोचतील. त्यानंतर येथून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेमार्गाने केला जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळेसुद्धा राज्याची ऑक्सिजनची गरज भागणार असल्याचे म्हटले जात आहे.
इतर बातम्या :
कोरोनाचा विद्रूप चेहरा ! शेवटच्या श्वासापर्यंत बेडसाठी वणवण, शेवटी बसस्थानकात पत्नीसमोर प्राण सोडला
(due to increase in Corona patient Oxygen generation project will establish in Parbhani)