Mega Block : मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉग; ठाणे – कल्याण चार तास बंद, कुर्ला – वाशी हार्बर मार्गही राहणार 5 तास बंद

कुर्ला - वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक चालवण्यात येणार असून यामुळे ही काही बदल करण्यात आले आहेत.

Mega Block : मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉग; ठाणे - कल्याण चार तास बंद, कुर्ला - वाशी हार्बर मार्गही राहणार 5 तास बंद
मुंबई लोकल Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 6:00 AM

मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) रविवार आला की मेगा ब्लॉगची घोषणा होते. ज्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसतो. तर अनेक जनांना हा मेगा ब्लॉग म्हणजे घरी राहण्याचं कारण. यावेळीही मध्य रेल्वेकडून मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. आज शुक्रवार रेल्वेकडून विविध कामांसाठी मेगा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे. या कामांसाठी ठाणे – कल्याण 5व्या आणि 6व्या मार्गावर सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत तर कुर्ला – वाशी अप आणि डाऊन हार्बर (Harbor) मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे. ठाणे – कल्याण मार्गावर 4 तास तर कुर्ला – वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर तब्बल 5 तासांचा ब्लॉग असणार आहे. त्यामुळे अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांसह डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात येणार आहेत.

रविवार दि. 19.06.2022 रोजी मेगा ब्लॉक

मध्य रेल्वे, मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत 5व्या आणि 6व्या मार्गासाठी मेगा ब्लॉक चालवण्यात येणार आहे. हा ब्लॉक ठाणे – कल्याण 5व्या आणि 6व्या मार्गावर सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात येतील. त्या पुढील प्रमाणे

11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्सप्रेस, 17611 हजूर साहिब नांदेड- मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन, 13201 पाटणा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 17221 काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 22160 चेन्नई-मुंबई एक्सप्रेस, 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस, 12321 हावडा- मुंबई मेल (प्रयागराज मार्गे), 12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिरा उशिराने पोहोचतील.

हे सुद्धा वाचा

डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या

11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस आणि 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कल्याण येथे 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचेल. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ठाणे आणि दिवा दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा चालेल.

कुर्ला – वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक चालवण्यात येणार असून यामुळे ही काही बदल करण्यात आले आहेत.

विशेष लोकल चालविण्यात येतील

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणारी आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कुर्ला आणि पनवेल – वाशी या सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील.

ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ मार्गे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर व्यक्त करण्यात आली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.