या जिल्ह्यात गव्यांचे प्रमाण अधिक, वारंवार दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मागच्या महिन्यात सात सहा गव्यांचा मृत्यू झाला होता. एका पाठोपाठ एक मृत्यू झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील जत (jat) तालुक्यातील सोन्याळ (sonyal) येथील एका शेतात गव्याचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या परिसरात दाखल झाले आहेत. यानंतर गवा बंडगरवाडी, विठुराया मंदिर परिसर आणि लकडेवाडी परिसरात फिरत दिसला आहे. त्यामुळे शेतकरी (farmer) व नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. गवा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी सुध्दा केली होती. गवा असल्याची बातमी गावात सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गव्याचे दर्शन होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उभ्या पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुध्दा केलं आहे.
गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
जत तालुक्यातील सोन्याळ येथे गव्याचा मुक्तसंचार सुरू आहे. कित्येक वर्षांनंतर गवा दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने त्याची दखल घेऊन गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व सोन्याळ, लाकडेवडी ग्रामस्थ वर्गाकडून करण्यात येत आहे. अचानक गवा दिवसाढवळ्या संचार करत असल्याचे स्थानिकांना दिसून आले आहे. गवा रेड्याने आपला मुक्काम या परिसरात सुरू केल्याने भीतीचे सावट पसरले आहे. गवा दिसून आल्यानंतर स्थानिकांनी गव्याला हटकले. याबाबत वनविभाग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष न करता गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
या तालुक्यात गव्यांचं प्रमाण अधिक
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मागच्या महिन्यात सात सहा गव्यांचा मृत्यू झाला होता. एका पाठोपाठ एक मृत्यू झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी गव्याचा विषबाधेतून मृत्यू झाला असल्याचा संशय त्यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. शिराळा तालुक्याला लागून चांदोली अभयारण्य आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यात गव्याचं प्रमाण अधिक आहे.शेतातील शेतकऱ्यांच्या पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुध्दा करीत आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काही गव्यांचे कळप जंगलात सुद्धा सोडले आहेत.