Marathi News Maharashtra During the inauguration of 'Tractor is ours, diesel is yours' scheme, Chakka Bachchu Kadu plowed the field while driving the tractor
Video : बच्चू कडूंनी चक्क ट्रॅक्टर चालवत केली नांगरनी; बच्चू कडू ट्रॅक्टर चालवतात तेव्हा….!
'ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे' या योजनेच्या उद्घाटनादरम्यांन, चक्क बच्चू कडूंनी शेतात ट्रॅक्टर चालवित नांगरणी केली
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडूImage Credit source: tv9
अकोला : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Guardian Minister Bachchu Kadu) हे आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे ओळखले जातात. तर मागील काही दिवसांपासून ते रस्त्यांच्या कामातील अपहारप्रकरणी चर्चेत होते. त्याप्रकरणात त्यांना दिसाला मिळाला असून जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा टकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आता बच्चू कडू आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे शेतीमुळे. बच्चू कडू यांनी आज जिल्ह्यात ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ या योजनाचा शुभारंभ आज केला. तर हा कार्यक्रम अकोला जिल्ह्यातील वरूर जवूळका (Varur Jawulka) येथे पार पडला. यावेळी जिल्ह्यातील तब्बल 153 महिलांना ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ या योजनेअंतर्गत मदत पुरवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. विशेषबाब म्हणजे या योजनेच्या उद्घाटनादरम्यांन, चक्क बच्चू कडूंनी शेतात ट्रॅक्टर (Tractor) चालवित नांगरणी केली.
अकोला जिल्ह्यातील निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना आधार मिळावा म्हणून पालकमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ या योजनाचा शुभारंभ आज करण्यात आला. तर जिल्ह्यातील तब्बल 153 महिलांना ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ या योजनेअंतर्गत मदत पुरवली जाणार आहे. शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाहाची वेळ महिलांवर येते. त्यावेळी शेतीवर अवलंबून रहावे लागते. मात्र शेती करताना ही अनेक अडचणांना महिलांना तोंड द्यावे लागते. महत्वाचे म्हणजे नांगरणी, वखरणी, पंजी आणि पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैशांची चणचण भासते. त्यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाहासह शेतीचाही प्रश्न उभा असतो. याचा सारासार विचार करत बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रयत्नाने ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ या योजनाचे शुभारंभ केला. तर या योजनेच्या उद्घाटनावेळी चक्क बच्चू कडू यांनी शेतात ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली. याच्याआधी देखील बच्चू कडू यांनी अनेक अपक्रमात भाग घेतला आहे. ज्यामुळे त्यांचे नाव राज्यात सदा चर्चेत राहते.
कडू यांची चक्क रक्त तुला
राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी नयना कडू यांची चक्क रक्त तुला करण्यात आली होती. बच्चू कडू यांनी आता पर्यंत जवळपास 97 वेळा रक्तदान केले आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरही ते नेहमीच आयोजित करत असतात. त्यांना रक्तदान कार्यक्रमात मोठी आवड आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस रक्तदान करुन नामांकन अर्ज दाखल केला होता. तर, मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देखील त्यांनी रक्तदान केले होते. तसेच, मंत्रालयाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीही रक्तदान केलं होतं.
आपल्या वेगळ्या अंदाजासाठी आणि आपल्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच ओळखले जाणाऱ्या बच्चू कडू यांनी 2020 ची दिवाळी अमरावतीमधील मधुबन वृद्धाश्रमात साजरी केली होती. त्यावेळी त्यांनी मधुबन वृद्धाश्रमात वृद्धांसोबत दिवाळीचा आनंद लुटला होता.