Shiv Sena Dussehra Melava 2023 live updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन

| Updated on: Oct 24, 2023 | 10:00 PM

Dussehra Melava 2023 live updates : आज दसऱ्याचा सण... आपट्याची पानं आज सोनं म्हणून देत शुभेच्छा दिल्या जातात. या दसऱ्याला राजकीय महत्व देखील आहे. राजकीय नेत्यांच्या सभांनी आजचा दिवस गाजतो. या दसरा मेळाव्यातील भाषणांचे सर्व अपडेट्स तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर पाहता येणार आहेत. तसंच आमच्या वेबसाईटवर वाचता येतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा ब्लॉग फॉलो करा

Shiv Sena Dussehra Melava 2023 live updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन
shinde vs uddhav

मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा… आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण… त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावारण आहे. महाराष्ट्रात दसरा सणाचं राजकीय महत्व देखील जास्त आहे. त्याच कारण आहे विजयादशमीच्या दिवशी होणारे दसरा मेळावे. दादरमधील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडेल. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटही दसरा मेळावा घेत आहे. यंदा मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडेल. तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा आज पार पडेल. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही ‘विजयादशमी उत्सव’ पार पडतोय. या दसरा मेळाव्यातील भाषणांकडे राज्याचं लक्ष आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Oct 2023 09:58 PM (IST)

    Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचं मराठा समाजाला भावनिक आवाहन

    मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं. ते भाषण सुरु असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेले. त्यांनी शिवरायांना वंदन केलं. त्यानंतर त्यांनी शिवरायांची शपथ घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहन केलं. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 24 Oct 2023 08:06 PM (IST)

    Uddhav Thackeray Speech | ‘५७ वर्ष झाले पण आपण आपली परंपरा चालूच ठेवली’, उद्धव ठाकरे यांचा पहिला निशाणा

    मुंबई | उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केलीय. ५७ वर्ष झाले पण आपण आपली परंपरा चालूच ठेवली आहे. काही लोकांनी ही परंपरा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण आपण मोडू दिला नाही. आपला मेळावा झाल्यानंतर इथे आपण खोकासुराचं दहन करणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 24 Oct 2023 08:00 PM (IST)

    Sanjay Raut | ‘मंत्री उदय सामंत यांचा शंभर कोटींचा डांबर घोटाळा समोर आलाय’, संजय राऊतांचा आरोप

    मुंबई | “रत्नागिरी जिल्ह्यातून नवीन घोटाळा समोर आलाय. मंत्री उदय सामंत यांचा शंभर कोटींचा डांबर घोटाळा समोर आलाय. खोटी बिलं भरुन बांधकाम विभागाकडून १०० कोटी रुपये काढले आहेत”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

  • 24 Oct 2023 07:53 PM (IST)

    Eknath Shinde | एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल

    मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल झाले आहेत. लवकरच त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल.

  • 24 Oct 2023 07:52 PM (IST)

    Sanjay Raut | संजय राऊत यांचा शिंदे गटावर घणाघात

    मुंबई | “इथे मराठा तितुका मेळवावा सुरु आहे. तर तिकडे मराठा तितुका लोळवावा सुरु आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.

  • 24 Oct 2023 07:49 PM (IST)

    Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल

    मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. लवकरच त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. त्यांच्या भाषणाआधी खासदार संजय राऊत यांचं भाषण सुरु आहे.

  • 24 Oct 2023 07:13 PM (IST)

    Sushma Andhare | सुषमा अंधारे यांचा मोठा गौप्यस्फोट

    मुंबई | नाशिकला एवढा शेकडो कोटींचा ड्रग्जचा साठा मिळतो तर नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळतोय का? मला नोटीस पाठवायची भाषा करणारे लोक माझ्याशी मांडवली करण्याचा प्रयत्न करतात, असा मोठा गौप्यस्पोट सुषमा अंधारे यांनी केला.

  • 24 Oct 2023 07:08 PM (IST)

    Sushma Andhare | सुषमा अंधारे यांच्या भाषणाला सुरुवात

    मुंबई | अंबादास दानवे यांच्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांंनी भाषणाला सुरुवात केली. मी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडत आहे. हा महाराष्ट्र ड्रग्जमुक्त, नशामुक्त झाला पाहिजे. आज सद्गुणांनी दुर्गुणांवर मात करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

  • 24 Oct 2023 07:04 PM (IST)

    Ambadas Danve Speech | अंबादास दानवे यांची सरकारवर सडकून टीका

    मुंबई | कोणताच दवाखाना आपला दवाखाना राहिलेला नाही. सर्व दवाखाने भांडलदारांचे झाले आहेत. वर्षभरात 6700 बालकांचा मृत्यू झालाय. या महाराष्ट्राला हे अभिमानास्पद नाही, ही आकडेवारी सरकारची आहे. बेटी बचाओची घोषणा होते. पण दररोज 70 मुली बेपत्ता होतात. स्वत:चं ९ कंपन्या देऊन खाजगीकरण केलं. भाजपच्या चेल्या चपाट्यांच्या कंपन्या होत्या. ३२ लाख लोकांना कंत्राटी पद्धतीने नोकरी दिला जात असेल तर सर्वसामान्य तरुणांनी करायचं काय, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. या सरकारने नोकर भरतीच्या नावाने कोट्यवधींचा निधी मिळवला. इतर राज्यात केवळ कार्डने स्वॅप करुन १०० रुपये फी घेतली जाते, असं अंबादास दानवे म्हणाले.

  • 24 Oct 2023 07:00 PM (IST)

    Ambadas Danve Speech | ‘सरकार म्हणतं सरकार आपल्या दारी, पण मी म्हणतो मृत्यू घरोघरी’

    मुंबई | उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच महाराष्ट्रातील दोन लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता, असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी 98 टक्के शेतकऱ्यांना 2 लाख रुपये एका थम्बवर दिले होते. पंतप्रधान किसान योजनाचं बोलायचं झालं तर लाभार्थ्यांची संख्या आता कमी झालीय. ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. सरकार म्हणतं सरकार आपल्या दारी. पण मी म्हणतो मृत्यू घरोघरी, आरोग्य विभागाची परिस्थिती भयानक आहे. रुग्णांना औषधी मिळत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. सरकार खोटं बोलत आहे, औषध दिल्याची खोटी माहिती देत आहे. रुग्णालयात स्टाफ नाही. सरकार डॉक्टरांचा सन्मान राखत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

  • 24 Oct 2023 06:51 PM (IST)

    Ambadas Danve | ‘गद्दारांनी दिल्लीच्या मालकांची चाकरी करावी’, अंबादास दानवे यांची टीका

    मुंबई | किशोरी पेडणेकर यांच्या भाषणानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाषणाला सुरुवात केली. दसरा मेळावा एकच असतो तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. गद्दारांनी दिल्लीच्या मालकांची चाकरी करावी, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. तुम्हाला आता घरीच बसायचं आहे. काय करायचं आहे ते तुम्हीच ठरवा, असं दानवे म्हणाले.

    राज्यात पापींचं राज्य महाराष्ट्रात आहे. त्यामुळे आपल्यावर निसर्ग कोपतोय. अर्ध्या पेक्षा जास्त महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. एक रुपयात पीक विम्याचं गाजर शेतकऱ्यांना दाखवलं गेलं. विमा कंपन्यांची खळगी भरण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा डाव आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केला.

  • 24 Oct 2023 06:45 PM (IST)

    गाझियाबाद : इंदिरापुरममधील कानवानी भागातील झोपडपट्टीला आग

    मुख्य अग्निशमन अधिकारी राहुल कुमार म्हणाले, “3:56 वाजता वैशाली अग्निशमन केंद्राला कानवणी परिसरात काही झोपडपट्ट्यांमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. गॅस सिलिंडरच्या स्फोट झाला आणि आग पूर्णपणे झोपडपट्टीत पसरली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • 24 Oct 2023 06:33 PM (IST)

    Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाने ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात

    मुंबई | ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आपल्या भाषणाने दसरा मेळाव्याला सुरुवात केली. एका राऊत, सौ दाऊद. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे थोड्याच वेळात उपस्थित होते. पहिली बॅटिंग मुंबईची महापौर म्हणून माझ्यावर आहे. कुणीही कितीही आरोप-प्रत्यारोप करु दे पण ती धुरा आम्ही वाहतोय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

    किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

    मुंबईचं डान्सबार करु नका. बुडाखाली अंधार दिसतोय. शिवसैनिकांना नम्न विनंती आहे, जे आदेश पक्षाचे आले आहेत, आपण सिनेटच्या निवडणुकीत बऱ्यापैकी जोर लावला. त्यामुळे ही निवडणूक रद्द झाली. आता पदवीधर मतदारसंघ चालू आहे. घराघरात आपला पदवीधर मतदार आहे.

    आपण संपूर्ण मुंबईचं चित्र बघितलं तर २०२० पासून आजपर्यंत आदित्य ठाकरेंनी जे काम केलं, त्यांच्या बरोबर मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचे मी आभार मानते, त्यांनी सूचनांचं पालन केलं. त्यामुळे मुंबईत फार कुठे पाणी साचलं नाही.

    आम्ही मुंबईला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतोय. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी काम केलं.

    तिथे बाळासाहेबांची खुर्ची तिथे आहे. खुर्ची खूप मिळतात. बाळासाहेबांचा आत्मा कुठे आहे ते बोलाना. शिवसैनिकांच्या रुपाने बाळासाहेबांचा आत्मा इथे आला आहे.

    गुजरातचा कपडा घेऊन महाराष्ट्राचा विद्यार्थी एका गणवेशात पाहिजे असं चाललं आहे. हे तुम्हाला चालणार आहे का? आदित्य ठाकरेंनी चार बोर्ड आले. सामान्य जनतेच्या मुलांना मोफत शिक्षण मिळायला हवं.

    मैदानावरुन जेवढं राजकारण झालं, न्याय व्यवस्था आजही सत्याची बाजू राखून आहे. त्यामुळे कितीही कुरखोडी घातल्या तरी शिवाजी पार्क मैदान उद्धव ठाकरेंना मिळणार. दसरा मेळाव्याला पुढचे ५० वर्षेही हेच मैदान असणार आहे.

  • 24 Oct 2023 06:30 PM (IST)

    केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा महुआ मोइत्रा यांच्यावर निशाणा

    टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर लाचखोरीच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय आहे. संसदेशी संबंधित असलेली किंवा कोणत्याही प्रकारचे संकट निर्माण करणारी इतर कोणतीही माहिती शेअर करणे म्हणजे भ्रष्टाचार होय.”

  • 24 Oct 2023 06:25 PM (IST)

    Mumbai News | शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, सांस्कृतिक कार्यक्रम सुरु

    मुंबई | शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झालीय. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झालीय.

  • 24 Oct 2023 06:15 PM (IST)

    विजयादशमीनिमित्त बिहारमधील पाटण्यात ‘रावण दहन’

  • 24 Oct 2023 05:57 PM (IST)

    उत्तर प्रदेश: कानपूरच्या फाजलगंज पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या KIA शोरूममध्ये आग

  • 24 Oct 2023 05:55 PM (IST)

    इस्रायलवरील 7 ऑक्टोबरचा हल्ला जगासाठी धक्कादायक: मॅक्रॉन

    इस्रायलमध्ये पोहोचलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्स इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचे म्हटले आहे. 7 ऑक्टोबरचा हल्ला जगाला धक्का देणारा आहे. भेदभाव न करता सर्व ओलीस सोडले पाहिजेत. इस्रायलच्या मदतीसाठी सर्व पावले उचलणार.

  • 24 Oct 2023 05:52 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानाकडे रवाना

    शिवसेनेचा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. या मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. यासाठी आता एकनाथ शिंदे मैदानाकडे रवाना झाले आहेतय

  • 24 Oct 2023 05:46 PM (IST)

    ‘रावण दहन’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले

  • 24 Oct 2023 05:45 PM (IST)

    विश्वचषकाच्या सामन्यांच्या तिकिटांची बनावट वेबसाइटवरून विक्री

    लखनौमध्ये विश्वचषकाच्या तिकिटांच्या नावाखाली बनावट वेबसाइटवर फसवणूक केली जात आहे. भारत आणि इंग्लंड सामन्याचे तिकीट देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. 29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये हा सामना होणार आहे. वेबसाइटवर 2000 रुपयांपासून 18,790 रुपयांपर्यंत तिकिटांची विक्री केली जात आहे.

  • 24 Oct 2023 05:30 PM (IST)

    दसरा मेळाव्यात ठाकरेंचा आवाज घुमणार : सुषमा अंधारे

    ते लोकं काय करत आहे त्यांना कळत नाही, हे ईश्वरा तु त्यांना माफ कर. आपण त्यांच्यासाठी अपार सहानभुती बाळगून क्षमायाचना करूयात. बाळासाहेबांची खूर्ची त्यांनी ठेवली आहे. अजून काय काय करतील.बाळासाहेबांसारखे फोटो वगैरे काढून फोटोसेशन केलं आहे.पण बाळासाहेबांप्रती निष्ठा ठेवणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे.

  • 24 Oct 2023 05:15 PM (IST)

    आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा

    आझाद मैदानावर शिवसैनिकांची गर्दी होत आहे. शिसैनिक मोठ्या संख्येने मैदानात पोहोचत आहेत. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचा मेळावा पारंपरिक शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठीही कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे या दोन्ही सभांमधून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जातील.

  • 24 Oct 2023 05:07 PM (IST)

    शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची ताकद दहापटीने वाढली आहे- राजन विचारे

    शिवसेनेची ताकद दहापटीने वाढली आहे. त्यामुळे आम्हाला घाबरण्याची गरज नाही. त्यांनी शिवसैनिकांना पोकळ धमक्या देऊ नयेत. आम्ही त्यांना घाबरत नाहीत. ड्रग्सची पालंमुलं ठाण्यातही असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केलं.

  • 24 Oct 2023 04:57 PM (IST)

    दसरा मेळावा, आवाज कुणाचा?

    शिवसेनेच्या दोन्ही गटाचा मुंबईत दसरा मेळावा थोड्याच वेळात होत आहे. गेल्यावेळी पण दसरा मेळाव्यातून दोन्ही गटात चुरस दिसली होती. गर्दी खेचण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. गेल्यावेळी गट फुटीनंतर भावना तीव्र होत्या. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आज कुणाचा आवाज मुंबईत घुमणार हे थोड्याच वेळात समोर येईल. दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

  • 24 Oct 2023 04:28 PM (IST)

    उद्यापासून शांतेत युद्ध

    उद्यापासून शांतेत युद्ध सुरु होणार आहे. तुम्हाला हे युद्ध पेलणार नाही, तुम्हाला युद्ध झेपणार नाही, सरकारला आम्ही हा शब्द सांगून ठेवला आहे. मी लहान भाऊ, मोठा भाऊ मानत नाही. धनगर समाजानं आरक्षणासाठी आवाज उठवला आहे. त्यांना आरक्षण मिळणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी यावेळी राज्य सरकारला अल्टिमेटम संपत आल्याचे सांगितले. उद्यापासून शांतेत युद्ध सुरु होणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

  • 24 Oct 2023 04:23 PM (IST)

    सरकारला आरक्षण द्यावंच लागेल – जरांगे पाटील

    सरकारच्या छाताडावर बसणार पण आरक्षण सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. नगरच्या चौंडीत धनगर समाजाच्या मेळाव्यात ते बोलत आहे. धनगर समाजाने मनावर घेतलंय, त्यांना आरक्षण मिळणारच असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची त्यांनी आठवण करुन दिली.

  • 24 Oct 2023 04:03 PM (IST)

    शिवसैनिकांची शिवाजी पार्ककडे धाव

    राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवाजीपार्ककडे येण्यास सुरुवात केली आहे. शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होत आहे. त्याअगोदर डॉग स्कॉडने हा परिसर पिंजून काढला. सभेच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. आज शिंदे गटाचा पण दसरा मेळावा रंगणार आहे.

  • 24 Oct 2023 04:02 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री समोर शिंदे गटाचे स्वागत कक्ष

    बांद्रा : उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास स्थानाबाहेरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी पश्चिम उपनगरातून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी स्वागत कक्ष उभारलंय. शिंदे गटाचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी हे स्वागत कक्ष उभारले आहे.

  • 24 Oct 2023 03:44 PM (IST)

    सोलापुरात 11 नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

    सोलापुर : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सर्वपक्षीय 11 नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यासह दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रतिमा लावलेल्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून 50% च्या आत आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.

  • 24 Oct 2023 03:29 PM (IST)

    माजी खासदार निलेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात गुप्त बैठक

    सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि निलेश राणे यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये निलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची भूमिका नारायण राणे यांनी जाणून घेतली. नारायण राणे यांनी निलेश राणे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला अशी माहिती सूत्रांनी दिली.

  • 24 Oct 2023 03:04 PM (IST)

    शरद पवारांचा ताफा अडवला, रोहित पवार म्हणाले

    पुणे : शरद पवारांचा ताफा कुणी अडवला, का अडवला? यामागे नेमकं कोण होत? का केलं याचा अभ्यास करण्याची गरज आहे. ताफा अडवणारे कोण होते हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

  • 24 Oct 2023 02:59 PM (IST)

    मोठी बातमी : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या खासगी बसला अपघात

    कसारा : यवतमाळहून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला नवीन कसारा घाटात अपघात झालाय. अपघातात बसमधील 8 ते 10 जण जखमी झालेत.

  • 24 Oct 2023 02:48 PM (IST)

    मी कधी झुकणार नाही – पंकजा मुंडे

    बीड : २०२४ पर्यंत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहे. आता घरी बसणार नाही. तुम्हाला मैदानात दिसेल. त्या मैदानात कोण असेल हे ही तुम्हाला दिसेल. मी कधी झुकणार नाही. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

  • 24 Oct 2023 02:43 PM (IST)

    Pankaja Munde | माझ्या लोकांना न्याय देणे माझे कर्तव्य – पंकजा मुंडे

    माझ्या लोकांना न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे. माझी माणसे आता संयम दाखवणार नाही. परंतु दुसऱ्या पक्षात जाण्याएवढी मी लेचीपेची नाही. दुसऱ्याच्या मेहनतीचे मी खाणार नाही.

  • 24 Oct 2023 02:36 PM (IST)

    Pankaja Munde | मला त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात असणार – पंकजा मुंडे

    मला त्रास देण्याचे घर उन्हात असणार आहे. माझ्यावर भगवान बाबांची सावली आहे. माझ्या सभेला राज्यातून सर्वच भागातून जनता आली आहे.

  • 24 Oct 2023 02:28 PM (IST)

    Pankaja Munde | मी लोकांना फक्त स्वाभिमान देऊ शकते – पंकजा मुंडे

    लोकांना सरकारकडून खूप अपेक्षा आहे. मी लोकांना फक्त स्वाभिमान देऊ शकते. आपला आवाज आता देशात पोहचला पाहिजे. मी हरले तरी तुमच्या नजरेतून कधीच उतरले नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

  • 24 Oct 2023 02:00 PM (IST)

    Abdul Sattar | संजय राऊत ह्यांना ड्रग्सची सवय असेल म्हणून त्यांना सगळीकडे तसं दिसत आहे

    संजय राऊत ह्यांना ड्रग्सची सवय असेल म्हणून त्यांना सगळीकडे तसं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांना संपवणारा संजय राऊत आहेत. आम्ही ह्या ठिकाणी मेळाव्याला आलोय आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भाषणातून आम्ही सर्व दंग होणार आहे आणि सिल्लोडला जाणार आहे. प्रत्येक आरोपवार बोलणार नाही पण शिवसेना हीं आमची आहे आणि सुप्रीम. कोर्टाने देखील देत सांगितलं आहे. – अब्दुल सत्तार

  • 24 Oct 2023 02:00 PM (IST)

    Pune Solapur Highway | पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर नजिक बायपासजवळ दुचाकीला ट्रकने

    पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर नजिक बायपासजवळ दुचाकीला ट्रकने चिरडले. या अपघातात दुचाकी स्वार दशरथ चोरमले जागीच ठार झाला. जमावाने ट्रक पेटउन दिला. चोरमले हे सकाळी इंदापूर दूध घालून घरी निघाले होते. घटना स्थळी तत्काळ इंदापूर पोलिस हजर झाले.

  • 24 Oct 2023 01:54 PM (IST)

    Pankaja Munde | भगवान भक्तीगण ट्रस्ट कडून पंकजा मुंडेंचा सत्कार

    मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. भगवान भक्तीगण ट्रस्ट कडून पंकजा मुंडेंचा सत्कार. पंकजा मुंडेंच्या सभास्थळी मोठी गर्दी.

  • 24 Oct 2023 01:52 PM (IST)

    Abdul Sattar | या ठिकाणी माझा विधानसभा सिल्लोड मधून 200 बस भरून लोक आलेली आहे

    दसरा मेळाव्यासाठी सर्व जणांना आनंद आहे. या ठिकाणी माझा विधानसभा सिल्लोड मधून 200 बस भरून लोक आलेली आहे. आज ह्या ठिकाणी बाळासाहेबांनी ज्या प्रमाणे शिकवण दिली त्या प्रमाणे आम्ही चाललो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत आज ते आम्हला ह्या ठिकाणी चार्ज करणार आहेत. ती ताकद घेऊन आम्ही इथून जाणार आहे.. जे थांबलेत ते नकली आहेत आज एवढे लोक येतात एवढा उठाव होतो मग तो का होतो हे देखील पाहिलं पाहिजे ना? – अब्दुल सत्तार

  • 24 Oct 2023 01:46 PM (IST)

    Sharad Pawar | संघर्ष यात्रा जर आग्रह करत असेल तर सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणार

    संघर्ष यात्रा जर आग्रह करत असेल तर सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणार. मुख्यमंत्र्यांनी या तरुणांच्या मागण्यासाठी बैठक घ्यावी आणि त्या बैठकीला मी येणार, आणि सरकारकडून या मागण्या मान्य करून घेऊ, अन्यथा काय करायचं ते आपण बघू मात्र सरकार तुमच्या मागण्यांबाबत नक्कीच सकारात्मक बघणार अशी अपेक्षा – शरद पवार

  • 24 Oct 2023 01:33 PM (IST)

    रोहित पवारांची आशीर्वाद यात्रा तरुणांसाठी महत्त्वाची – शरद पवार

    रोहित पवारांची आशीर्वाद यात्रा तरुणांसाठी महत्त्वाची. समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न. ही संघर्ष यात्रा तरुणांना प्रोत्साहन – शरद पवार

  • 24 Oct 2023 01:13 PM (IST)

    Nashik | नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी स्मारक परिसरात महाबोधीवृक्ष महोत्सव

    नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी स्मारक परिसरात महाबोधीवृक्ष महोत्सव. श्रीलंकेतील अनुराधापुर येथील महाबोधी वृक्षाच्या फांदीचे करण्यात आले रोपण. श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्य हेमरत्न नायक थेरो यांच्या हस्ते ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे रोपण संपन्न. या महोत्सवास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, शहरातील भाजपचे तिन्ही आमदार उपस्थित. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाला सुरुवात. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष. कार्यक्रमाला देश विदेशातील भिक्खू आणि उपासकांची उपस्थिती

  • 24 Oct 2023 12:58 PM (IST)

    शरद पवारांचा एक काळ होता त्यावेळी गांभीर्याने चर्चा होत होती- रोहित पवार

    आज ग्रामीण भागात शेतकरी अडचणीत आहे, त्यावर कुणीच चर्चा करत नाही याला अन्याय म्हणतात. अन्यायाला एकच उत्तर आहे तो म्हणजे संघर्ष, तो आपल्याला करावा लागेल. अधिवेनशात कुणी कविता म्हणतात, कुणी गाणं म्हणतंय, कुणी काहीतरी कमेंट करतंय. शरद पवारांचा एक काळ होता त्यावेळी गांभीर्याने चर्चा होत होती, कविता ऐकून काय मिळणार आहे. आम्ही भुमिका बदलावी आणि सत्तेत जावं असं सांगितलं जातं होतं. सत्ता येते जाते, मात्र विचार कायम राहतात, असं रोहित पवार म्हणाले.

  • 24 Oct 2023 12:47 PM (IST)

    शिवसैनिक बालेवाडी स्टेडियम जवळ जमणार

    पुण्यातून देखील शिवसैनिकांकडून अनेक बसेस मुंबईला जाण्यासाठी बुक करण्यात आल्या. थोड्याच वेळात शिवसैनिक बालेवाडी स्टेडियम जवळ जमणार आहेत.

  • 24 Oct 2023 12:38 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील चौंडी येथे दाखल

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाला अभिवादन केलं आहे. चौंडी येथील धनगर आरक्षणाच्या दसरा मेळाव्याला जरांगे पाटील लावणार हजेरी लावला आहे.

  • 24 Oct 2023 12:23 PM (IST)

    पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल

    पंकजा मुंडे सहकुटुंब गोपीनाथ गडावर दाखल झाल्या आहेत. भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. काही वेळात त्या दाखल होतील. भगवान भक्ती गडावर आयोजन करण्यात आलं आहे.

  • 24 Oct 2023 11:55 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी राज्यभरात सुरू आहे. सर्व रस्त्यांवर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात दोन लाख लोक येणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. पोलिसांचीही पेट्रोलिंग सकाळपासून सुरू झाली आहे.

  • 24 Oct 2023 11:40 AM (IST)

    रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा

    रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू झाली असून ही यात्रा टिळक स्मारकाजवळ पोहोचली आहे. टिळक स्मारक मंदिराच्या बाहेर शरद पवार आणि रोहित पवारांचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. यावेळी जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. पुण्यातील टिळक स्मारक हॉलमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 24 Oct 2023 11:30 AM (IST)

    शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकमधून हजारो कार्यकर्ते रवाना

    नाशिक : मुंबईच्या आझाद मैदानावर आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून कार्यकर्ते रवाना होणार आहेत. नाशिकमधून हजारो कार्यकर्ते थोड्याच वेळात रवाना होणार आहेत. ढोल ताशा वाजवत, फुगडी खेळत कार्यकर्त्यांचा उत्साह पहायला मिळतोय.

  • 24 Oct 2023 11:20 AM (IST)

    पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावात राजकीय सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचे फलक

    पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावात राजकीय सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुंगत गावात राजकीय नेत्यांना फिरु देणार नसल्याचा इशारा सरपंच अमृता रणदिवे यांनी दिला आहे. तुंगत गावात राजकीय सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत तुंगत गावात नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष.. अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.

  • 24 Oct 2023 11:10 AM (IST)

    अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार पुण्याहून नाशिकला जात होते. बोधिवृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. नाशिकनंतर अजित पवार यांचा अहमदनगर दौरा होता. सकाळी सव्वा दहा वाजता अजित पवार नाशिकला येणार होते.

  • 24 Oct 2023 10:58 AM (IST)

    दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या अपघात

    सांगली – शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झालाय. या अपघातात एक ठार तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ ही घटना घडली. ट्रकने पदाधिकाऱ्याच्या गाडीला मागून धडक दिली आणि हा अपघात झाला.

  • 24 Oct 2023 10:55 AM (IST)

    महाराष्ट्र हा ड्रग्सचा हब बनवला जातोय का? संजय राऊत यांचा सवाल

    महाराष्ट्र हा ड्रग्सचा हब बनवला जातोय का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. देशात बच्चा बच्चा श्रीराम कधी बोलत नव्हता त्या बच्चापर्यंत ड्रग्स पोहचवलं जातं त्या रावणांकडून त्यांचा बंदोबस्त करा. पंचवटीमध्ये सर्वात जास्त ड्रग्स व्यापार सुरू आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही का? असा सवालही राऊत यांनी केली. पैठण, नागपूर, नाशिक विदर्भ अशा ठिकाणी ड्रग्स मिळते. मुंबई पुणेमध्ये व्यापार सुरु आहे. कोट्यवधींचा बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा मात्र ड्रग्स पिऊन श्रीराम बोलणार नाही .ड्रग्सचा रावण आजूबाजूला फिरत आहे आणि तुम्ही श्रीराम बोलत आहे. त्या रावणाला संपवा त्या नंतर रामाचे नाव घ्या, असेही राऊत म्हणाले.

  • 24 Oct 2023 10:40 AM (IST)

    ललित पाटील प्रकरणात दादा भुसे यांचं नाव घेणं सुषमा अंधारे यांना पडणार महागात

    ड्रग्स प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेत सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते. मात्र दादा भुसेंचं नाव घेणे आता महागात पडण्याची चिन्हे दिसताय. कारण मंत्री दादा भुसे यांनी सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवली आहे. नाशिकच्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात नाशिकचे पालमंत्री दादाजी भुसे यांचा सहभाग असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केला होता. या प्रकरणी मंत्री दादाजी भुसे यांनी सुषमा अंधारे यांना बदनामी केल्या संदर्भात त्यांच्या वकीलांमार्फत नोटीस पाठवली आहे.

  • 24 Oct 2023 10:35 AM (IST)

    चालकाला लागली डुलकी, दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात

    अमरावती जिल्ह्यातील हद्दीत दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झालाय. यामध्ये १४ जण जखमी झालेत. धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा जवळ हा अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून दीक्षाभूमीवर अनुयायी जात असताना समृद्धी महामार्गावर अपघात झाला. चालकाला झोप आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात १४ जण जखमी झाले आहेत. तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

  • 24 Oct 2023 10:30 AM (IST)

    दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    मुंबईत आज दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शहरात १२ हजार पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आज मुंबईत दोन मेळावे पार पाडणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहेत.

  • 24 Oct 2023 10:25 AM (IST)

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, गुरुवारी या भागात दिवसभर पाणीपुरवठा बंद

    गुरुवारी पुण्यातील काही भागात दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, भुसारी कॉलनी, शिवतीर्थनगर, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी,डेक्कन, पुलाची वाडी, शिवाजीनगरचा परिसर, औंध, बाणेर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

  • 24 Oct 2023 10:23 AM (IST)

    शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला सजावट

    शिवाजी पार्कतल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला सजावट करण्यात आलीये. आज दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला सजावट करण्यात आली आहे. तर आज उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत. सकाळपासून शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे.

  • 24 Oct 2023 10:19 AM (IST)

    धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यशवंत सेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन

    अहमदनगर : जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे दसरा मेळावा होणार आहे.  धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी यशवंत सेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलतले, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, भाजप आमदार राम शिंदे, मनोज जरांगे उपस्थित राहणार आहेत.

  • 24 Oct 2023 10:06 AM (IST)

    Live Update | फडणवीस गृहमंत्री असताना महाराष्ट्रात ड्रग्ज येतं कसं? – संजय राऊत

    फडणवीस गृहमंत्री असताना महाराष्ट्रात ड्रग्स येतं कसं? सरकार नक्की कोणाच्या नेतृत्वात? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या रावणांना संपवा. मोठे उद्योग गुजरातमध्ये गेले आणि तिथून इथे ड्रग्ज येत आहेत. नाशिकच्या पंडवटीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज रॅकेट सुरु… असा मोठा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

  • 24 Oct 2023 09:56 AM (IST)

    Live Update | अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ चौंडी येथे दसरा मेळावा

    जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ चौंडी येथे दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी यशवंत सेनेकडून कडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मेळाव्याला यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलतले, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, भाजप आमदार राम शिंदे, मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार आहेत. तर सरकारला इशारा देण्यासाठी या मेळाव्याचा आयोजन केल्याचं बाळासाहेब दोलतले यांनी म्हटलं आहे.

  • 24 Oct 2023 09:40 AM (IST)

    Live Update | मुंबई – ईस्टन एक्स्प्रेस महामार्गावर शिंदे गटाची जोरदार बॅनरबाजी

    मुलुंड पासून दादर पर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी दसरा मेळाव्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. शिवसेनेचा एकच तत्व साहेबांचे हिंदुत्व साहेबांचं शिष्यत्व.. अशा आशयाचे ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. तर शिवसेना या शब्दासाठी अभिमानी हिंदुत्व पाठी… अशा देखील आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. सायंकाळी आझाद मैदानावरती शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे

  • 24 Oct 2023 09:24 AM (IST)

    Live Update | भारत सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे जात आहे – मोहन भागवत

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपूर याठिकाणी पार पडत आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत संबोधीत करत आहेत. भारत सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे जात आहे. डिजीटल क्षेत्रामध्येही भारताचा वेगाने विकास होत आहे. देशात G-20 चं आयोजन यशस्वीपणे पार पडलं आहे. २२ जानेवारीला रामलल्ला अयोध्येच्या मंदिरात प्रवेश करणार.. असं वक्तव्य देखील मोहन भागवत यांनी केलं आहे.

  • 24 Oct 2023 09:13 AM (IST)

    Live Update | बीडच्या सावरगावमध्ये पंकजा मुंडे यांचे ‘भावी सीएम’ म्हणून बॅनर

    बीडच्या सावरगावमध्ये पंकजा मुंडे यांचे ‘भावी सीएम’ म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. बीडच्या सावरगावमध्ये आज पंकजा मुंडे यांचा दसरा मोळावा..

  • 24 Oct 2023 08:59 AM (IST)

    Rohit Pawar | रोहित पवार यांच्या यात्रेला थोड्याच वेळात सुरुवात

    आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा थोड्याच वेळात सुरु होणार आहे. पुणे शहरातील लाल महालातून यात्रेला सुरुवात होणार आहे. लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करून रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे.

  • 24 Oct 2023 08:46 AM (IST)

    maharashtra news | कराडमध्ये शस्त्र पूजन, भव्य दौड

    कराडमध्ये विजय दशमीनिमित्त शस्त्र पूजन आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातून भव्य दौड अन् रॅली काढण्यात आली. डॉ.अतुल भोसले विक्रम पावसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर शस्त्र पूजन केले.

  • 24 Oct 2023 08:31 AM (IST)

    maharashtra news | सरकार आरक्षण देणार – जरांगे पाटील यांना विश्वास

    सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल. आम्हाला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आता सरकारला आरक्षणासाठी एक तासही वाढवून भेटणार नाही. जे मराठा नेते आरक्षणाला विरोध करत आहेत, त्याच्याविषयी बोलणार नाही. आज चौंडी येथे जाऊन अहिल्यादेवी यांचे दर्शन घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

  • 24 Oct 2023 08:21 AM (IST)

    maharashtra news | धरणाचे पिल्लर खचले

    गडचिरोली महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागात असलेल्या मेडिगट्टा लक्ष्मी धरणाचे तीन पिल्लर खचले आहे. या धरणात एकूण 85 दरवाजे आहे. सहा सात व आठ नंबराचे असे तीन पिलर खचल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

  • 24 Oct 2023 08:07 AM (IST)

    Rohit Pawar | रोहित पवार यांची आजापासून यात्रा

    आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आजपासून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रोहित पवार यात्रेला सुरुवात करणार आहेत. पुणे ते नागपूर असा या यात्रेचा प्रवास असणार आहे.

  • 24 Oct 2023 07:57 AM (IST)

    दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज

    दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.  देवी विसर्जन दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज सकाळी सात ते उद्या सकाळी सातपर्यंत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.  नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज आहे.

  • 24 Oct 2023 07:55 AM (IST)

    डोंबिवलीत बॅनर वॉर!

    दसरा मेळाव्याच्या निमित्ताने डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात बॅनर युद्ध पाहायला मिळतंय. ठाकरे गटाच्या बॅनरवर “निष्ठावंतांचा दसरा मेळावा, धगधगत्या मशालीचा धगधगता विचार” अशा आशयाचा मजकूर आहे. शिंदे गटाच्या बॅनरवर “शिवसेनेचे एकच तत्व साहेबांचे हिंदुत्व , साहेबांचं शिष्यत्व, शिवसेना या शब्दासाठी अभिमानी हिंदुत्वासाठी “अशा आशयाचा मजकूर आहे.

  • 24 Oct 2023 07:44 AM (IST)

    विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट

    पंढरपुरातही दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. आज दसऱ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिराला झेंडुच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. एक टन फुलांचा वापर करुन ही सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्याकडून ही सजावट करण्यात आली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा तसेच मंदिराच्या इतर भागांना लाल पिवळ्या झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.  चारखांबि , सोळखांबी , सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागाना देखील झेंडूच्या फुलांची सजावट केली गेली आहे.  झेंडू फुलांच्या सजावटिमुळे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे . श्री विठ्ठल आणि रुक्मिनिमातेचे दर्शन घेण्यासाठि भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.

Published On - Oct 24,2023 7:35 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.