ED ची नोटीस… टेंशन टेंशन, काँग्रेस नेत्याने थेट मुंबई ऑफिसला फोन केला अन्..

ईडीची नोटीस आली की भल्या भल्यांना घाम फुटतो. नांदेडमध्येही असाच प्रकार घडला. पण काँग्रेस नेत्याच्या बाबतीत ही नोटीस खरी की खोटी, असा मोठा संभ्रम निर्माण झालाय.

ED ची नोटीस... टेंशन टेंशन, काँग्रेस नेत्याने थेट मुंबई ऑफिसला फोन केला अन्..
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 8:58 AM

राजीव गिरी,नांदेड : ईडी आणि सीबीआयची नोटीस (Notice) म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. त्यातच भाजप (BJP) विरोधी पक्षाच्या नेत्याला अशी एखादी नोटीस यावी आणि टेंशन वाढू नये, असं होऊ शकत नाही. नांदेडमध्ये (Nanded) असाच प्रकार घडला. महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांना ईडीची नोटीस आली. गुरुवारी ही नोटीस आली तेव्हा शमीम यांना धक्का बसला. कुणी तरी कटकारस्थान केलंय की काय असा संशय आला. यामागे काही राजकीय षडयंत्र आहे की काय, अशीही शंका आली. शमीम यांनी या प्रकरणाची शहानिशा करायचं ठरवलं तर भलताच प्रकार समोर आला.

काय घडलं नेमकं?

नांदेड महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांना गुरुवारी दुपारी १ वाजता ईडीची नोटिस आली . स्पीड पोस्टाने सक्तवसुली संचलनालयाची ही नोटीस आली. ती पाहून शमीम अब्दुल्ला यांना धक्काच बसला. त्यावर अतिरिक्त संचालक निखिलकुमार गोवीला यांची स्वाक्षरी आहे. तसेच स्वाक्षरीची तारखी १६ मार्च अशी आहे. आवश्यक कागदपत्रांसह २८ मार्च रोजी मुंबई येथील ईडी कार्यालयात हजर रहा, अशा सूचना त्यात देण्यात आल्या.

मुंबई ऑफिसात फोन… पोलिसात तक्रार

शमीम अब्दुल्ला यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात फोन करून सदर नोटिसीबाबत विचारणा केली. तेव्हा अशी नोटीस पाठवण्यात आली नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे ही नोटीस बनावट असल्याचा दावा शमीम अब्दुल्ला यांनी केलाय. त्यांनी नांदेडच्या इतवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही नोटीस नेमकी खरी आहे की बनावट याचा तपास पोलीस घेत आहेत.

याआधीही बनावट नोटीस?

नांदेड महापालिकेत गुंठेवारी विभागातील बनावट प्रमाणपत्र दिल्याचा घोटाळा उघड झाला होता .. गुंठेवारी विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते .. गेल्या डिसेंबर मध्ये या प्रकरणात नांदेड मधील वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता . जानेवारीमध्ये ईडीच्या नागपूर पथकाने नांदेड पालिकेत येऊन चौकशी देखील केली होती . बनावट गुंठेवारीच्या अनेक फाईल नागपुरच्या ईडी पथकाने ताब्यात घेतल्या होत्या . याच संदर्भाने आज शमीम अब्दुल्ला यांना नोटिस आली . विशेष म्हणजे चौकशी ईडीच्या नागपुर पथकाकडे आणि नोटिस आली मुंबई कार्यालयातून .. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला .. दरम्यान शमीम अब्दुल्ला यांच्या तक्रारीची चौकशी सुरू असून फेक नोटीस असेल तर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगीतलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.