ईडी अधिकारी पोहोचले कोल्हापूरमध्ये, आता ‘या’ बँकेवर घातला छापा

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी छापे घातल्यानंतर कोल्हापूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराभोवती गराडा घातला होता. सुमारे ११ तासांच्या चौकशीनंतर ईडी अधिकारी त्यांच्या घरातून निघून गेले होते.

ईडी अधिकारी पोहोचले कोल्हापूरमध्ये, आता 'या' बँकेवर घातला छापा
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 1:57 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी धाड टाकली होती. या धाडीत २५ अधिकारी सामील झाले होते. सुमारे ११ तासांच्या चौकशीनंतर हे अधिकारी रिकाम्या हाताने परतले होते. मात्र, त्यानंतर आज बुधवारी पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत धाड टाकली आहे.

हे सुद्धा वाचा

ईडी अधिकारी आज सकाळी जिल्हा बँकेच्या शाहूपुरी कार्यालयात पोहोचले. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली. काही दिवसांपूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा आरोप करणे सुरूच ठेवले होते. अखेर, आज पुन्हा ईडी अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले. ईडी अधिकारी बँकेत दाखल झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते बँकेच्या आवारात जमा झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी पुन्हा वाढल्याचे मानले जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.