ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या (Cm uddhav thackeray) मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर असे मुख्यमंत्र्यांच्या महुण्याचं नाव आहे, (Shridhar patankar) ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला (ED raid) टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. राज्यात ईडी सुडाने कारवाई करत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून सतत महाविकास आघाडीकडून करण्यात यतोय. तर या कारवाईत केंद्रचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या राडारावर आहेत. तसेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख तर जेलवारीत गेलेत. त्यामुळे या कारवाईने हा संघर्ष आणखी वाढणार हे स्पष्ट झालं आहे.
निलांबरी प्रोजेक्ट-
श्री साई बाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेडचा हा प्रोजेक्ट आहे
एकूण किती फ्लॅट्स
एकूण फ्लॅट्स 155 आहेत
एकूण 24 माळ्याची इमारत आहे
पहिल्या 6 माळ्यावर प्रत्येकी 4 फ्लॅट
तर 7 माळ्यापासून प्रत्येकी 8 फ्लॅटस
फ्लॅट्सची एकूण किंमत किती
यामध्ये वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट्स आहेत
यात 1 बीएचके किंमत – 72 ते 75 लाख रुपये
तर 2 बीएचकेची किंमत – 1 कोटी 20 लाख रुपये आहेत
सहा महिन्यांपासून लोक येथे राहायला आले आहेत अजूनही काही फ्लॅट्स रिकामे आहेत जिथे लोक राहायला आले नाहीत पण विकले गेले आहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे परवाच भाषण त्याना इतकं झोंबले आहे अशी स्पष्ट प्रतिक्रिया आहे-अरविंद सावंत
उद्धव ठाकरे यांनी मर्मावर बोट ठेवले
सुडाने पेटलेली माणसं कोणत्या टोकावर जातात हे बघा
पण एक लक्षात ठेवा महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही इतिहासामध्ये झुकला नाही, झुकणार ही नाही
आगे आगे देखिए होता है क्या!
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा.
सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या!— Narayan Rane (@MeNarayanRane) March 22, 2022
ईडीच्या कारवाईवर माहिती घेऊन बोलू
याबाबत मला आणखी काही माहिती नाही
सविस्तर माहिती घेऊन बोलेन
ईडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचं पहिलं उत्तर
श्रीधर पाटणकर हे आमच्या परिवारातील आहेत,
त्यांना कुठलीही नोटीस न देता कारवाई केली,
आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, हे दाखविण्याचं काम या कारवाई च्या माध्यमातून होत आहे,
ज्या राज्यात सत्ता येऊ शकली नाही त्या ठिकाणी दबाव आणून कारवाई केली जात आहे,
ही राक्षसी प्रवृत्ती आहे,
भाजप सरकार आल्यापासून ईडी च्या कारवाई वाढल्या आहेत
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, तामिळनाडू या भागात कारवाया वाढल्या आहेत,
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात कारवाया केल्या वाढल्या आहेत,
न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही,
न्यायालय सुद्धा दबावाखाली आहे,
तानाशाही सुरू आहे, चार राज्यात जिंकले म्हणजे तानाशाही असं होतं नाही,
आम्हाला सर्वांना जेल मध्ये टाकून द्या,
आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढायला तयार आहे
ईडी सारख्या एजन्सी चा दुरुपयोग योग्य नाही,
ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया या राजकीय सूडाच्या कारवाया सुरू आहे
ईडी कडे, पंतप्रधान कार्यालयाकडे घोटाळ्याचे अनेक पुरावे आणि माहिती दिली आहे,
मात्र बंदूक फक्त आमच्यावर रोखली जात आहे
2007 प्रकरण सुद्धा काढली जात आहे
आपल्याकडून ही माहिती मिळतेय
मी माहिती घेऊन बोलेन
सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू
अशा पद्धतीचे प्रयत्न चुकीचे
तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ
आम्ही कोसळणार नाही
जनतेला कसं सुडाचे राजकारण सुरू आहे ते दिसतंय
आम्ही सगळीकडे पाहुण्यांच्या स्वागताची सोय करून ठेवू
अनिल देशमुखांच्या घरच्या नव्वद धाडी पडल्या
काही मिळालं नाही यातून
ज्या ठिकाणी जळतंय तिथेच धूर येतो
ही कारवाई कायद्याच्या चौकटीत आहे
मीडियाने सर्व गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत
याने सरकारला फरक पडणार नाही
ही कारवाई सुडाच्या भावनेतून होत आहे
रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक
ईडीनं या कंपनीच्या 11 फ्लॅट जप्त केल्या
पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी रुपयांचं विनातारण कर्ज हमसफर डिलर कंपनीनं दिलं होतं
हमसफर डिलर ही बनावट कंपनी असल्यााच ईडीचा आरोप
हमसफर डिलर ही नंदकिशोर चतुर्वेदी यांची कंपनी
नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्या बनावट कंपन्यांचे पैसे पाटणकरांच्या कंपनीत टाकण्यात आले
नंदकिशोर आणि महेश पटेल यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप
मनी लॉन्ड्रिंगच्या 30 कोटी रुपयांमधूनच ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमध्ये फ्लॅट्सचं बांधकाम केल्याचा ठपका
एकूण 11 फ्लॅट्स जप्त, 11 फ्लॅट्सची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये
2017 मध्ये महेश पटेल आणि चर्तुवेदीविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल
तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशासमोरील मोठा प्रश्न
पाटणकरांवरील ईडीच्या कारवाईवर पवारांची पहिली प्रतिक्रिया
ही आकडेवारी खाली असेल तर याच्यात राजकीय हेतुने त्रास देण्यासाठी ही कारवाई झाली
ही ईडी आता गावागावात गेली आहे
त्याला काही पर्याय आहेत