तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ, ED च्या कारवाईनंतर आव्हाडांचा BJP ला इशारा
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा पद्धतीचे प्रयत्न चुकीचे, तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ, असा कडकडीत इशाराच जिंतेंद्र आव्हाड यांनी भाजपला दिला आहे.
मुंबई : राज्यात ईडीची जी कारवाई (ED raid) सुरू आहे. त्यावरून पुन्हा जोरदार रान पेटलं आहे. पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची (Cm uddhav thackeray) संपत्ती ईडीने जप्त केल्यानेतर महाविकास आघाडीची नेते अधिकच आक्रमक झाले आहेत(Shridhar patankar) . यावरूनच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा पद्धतीचे प्रयत्न चुकीचे, तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ, असा कडकडीत इशाराच जिंतेंद्र आव्हाड यांनी भाजपला दिला आहे. आम्ही कोसळणार नाही, जनतेला कसं सुडाचे राजकारण सुरू आहे ते दिसतंय, असे म्हणत आव्हाडांनी भाजपला टार्गेट केलंय. तर जिथे जळतं तिथेच धूर येतो ही कारवाई योग्यच आहे. असे भाजप नेते सांगत आहेत.
पाहुण्यांच्या स्वागताची तयारी ठेऊ
ईडीचे पाहुणे सर्वांच्या घरी जायला लागले आम्ही सगळीकडे पाहुण्यांच्या स्वागताची सोय करून ठेवू, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अनिल देशमुखांच्या घरच्या नव्वद धाडी पडल्या, काही मिळालं नाही यातून, असे म्हणत ईडी मुद्दाम जामीन न मिळण्यासारखे गुन्हे दाखल करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. या कारवाईनंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांना रात्री झोप लागणार नाही, असा टोलाही सोमय्या यांनी लगावालाय.
राऊतांचाही भाजपला इशारा
ईडीच्या या कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाटणकरांवरील कारवाई म्हणजेच ठाकरे कुटुंबावरील हल्ला आहे. महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला ओळखतो. याची किंमत आज ना उद्या तुम्हाला चुकवावी लागेलच, असा इशारा देतानाच ईडीच्या कारवाई ही तर खरतनाक हुकूमशाहीची सुरुवात आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला आहे. श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी भाजप सरकारवर संताप व्यक्त करतानाच भाजपला सज्जड इशाराही दिला आहे.