Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी’, सोलापुरात मंदिर-मशिदीच्या भोंग्याद्वारे शिक्षणाचे धडे

सोलापूरमधील बादोली गावात एक आगळावेगळा शैक्षणिक उपक्रम सुरु करण्यात आला आहे (Education initiative in Solapur Badoli).

'व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी', सोलापुरात मंदिर-मशिदीच्या भोंग्याद्वारे शिक्षणाचे धडे
Follow us
| Updated on: Aug 06, 2020 | 6:42 PM

सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जशी जगण्याची पद्धत बदलली, तशी शिक्षणाची पद्धतही बदलली. मागील शैक्षणिक वर्षात अनेक परीक्षाच झाल्या नाहीत. यंदाचं शैक्षणिक वर्षांचेही अडीच महिने उलटले, मात्र अद्याप खबरदारीचा उपाय म्हणून शाळा काही सुरु झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून डिजिटल माध्यमातून मुलांचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. सोलापूरमधील बादोली गावात मात्र एक आगळावेगळा उपक्रम सुरु आहे (Education initiative in Solapur Badoli).

राज्यात इतर ठिकाणी कुठे मोबाईलद्वारे, तर कुठे डिजीटल क्लासरुमचा उपयोग करुन वेबिनार घेत शिक्षण सुरु आहे. मात्र, राज्यातील अनेक गावांमध्ये मोलमजुरीची अडचण झालेल्या कुटुंबांकडे अशा शिक्षणासाठी मोबाईलही उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सोलापूर जिल्ह्यतील बादोली गावातील शिक्षकांनी हाडाचे शिक्षक काय असतात हे दाखवून दिलंय. त्यांची ही आयडिया पाहून अनेकजण ‘व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी’ म्हणत आहेत.

अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावात गावकऱ्यांना मंदिराच्या भोंग्यावर कधी आरती, तर कधी हरिपाठ ऐकू यायचे. मात्र, आता या स्पीकरवरुन गावकऱ्यांच्या कानांवर चक्क विद्यार्थ्यांचा अभ्यास पडतो आहे. होय, याच गावातील के. पी. गायकवाड माध्यमिक शाळेतील मयूर दंतकाळे यांच्या संकल्पेतून गावातील 3 मंदिरांच्या भोंग्यावरुन (लाऊडस्पिकर) मुलांना शिकवले जात आहे. यासाठी शाळेने मंदिर आणि मशिदीच्या विश्वास्तांनाही यासाठी तयार केलं आहे. मयूर दंतकाकाळे या शिक्षकांनी याबाबत माहिती दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

सध्या मोबाईलद्वारे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे किंवा शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. तरीही ग्रामीण भागात याला मर्यादा येत आहे. त्यामुळेच यावर उपाय म्हणून बादोले गावातील शिक्षकांनी अनोखा आणि हटके उपक्रम सुरु केला.

सुरुवातीच्या काळात गावातील किती पालकांकडे मोबाईल याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 90 टक्के पालकांकडे स्मार्ट फोन असल्याचं निदर्शनास आले, तर त्यातही काही पालकांचे फोन हे फक्त फोन करण्यापुरते मर्यादित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये शिवाय पालकांनाही कोणताही आर्थिक भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेत ही कल्पना वास्तवात आणली आहे. गावातील 3 मंदिरातील भोंगे यासाठी वापरले असून सकाळी 7 ते सकाळी 9 पर्यंत या माध्यमातून 3 वर्गांचा अभ्यास शिकवला जात आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

शाळेचे मुख्याध्यापक सुनील गुमास्ते आणि शिक्षक सिद्धराम वाकडे यांनी सांगितलं, “सकाळी वर्गानुसार 7 च्या आधीच विद्यार्थ्यांचे कान स्पीकरच्या आवाजाकडे लागलेले असतात. कुणी घरात बसून तर कुणी झाडाखाली निवांत बसून काय अभ्यास करायचा या सूचना ऐकत आहेत. या नव्या संकल्पेनेचा विद्यार्थीही आनंद घेत आहेत.

गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. शोध नाही लागला, तर किमान त्यातून एक संकल्पना तर जन्माला येतेच. अगदी त्याचप्रमाणे बादोले गावाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नामधून ही संकल्पना पुढे आली. त्यामुळे अनेकजण आता ‘व्हॉट अॅन आयडिया’ सरजी असंच म्हणताना दिसत आहेत.

हेही वाचा :

मुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले, घरांतील माणसं धावतपळत बाहेर

मुंबईत 113 टक्के नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाई, देवेंद्र फडणवीसांचा हल्ला

पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होण्याची भीती

Education initiative in Solapur Badoli

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.