Education News : शाळेला शिक्षक मिळावे म्हणून वयोवृद्ध आजोबा बसले उपोषणाला, गावकऱ्यांचा पाठींबा, पण…
कोपरगाव तालुक्यातील आदर्श शाळा असलेल्या सोनेवाडी येथील विद्यालयात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आमची मागणी मान्य करावी अन्यथा शासनाविरोधात गावबंद करून आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अहमदनगर : गावातल्या शाळेत शिक्षक (teacher) नाहीत अशी महाराष्ट्रात (maharashtra) अनेक प्रकरणं उजेडात आली आहेत.गाावकऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत पत्र देऊनही शिक्षक नसल्याचं चित्र राज्यात अनेक ठिकाणी आहे. एका वर्गासाठी दोन शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची बाब पालकांच्या लक्षात आली आहे. अहमदनगर (ahmadnagar) जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात सोनेवाडी येथे शाळेत शिक्षक नसल्यामुळे वयोवृद्ध आजोबा उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत शाळेत शिक्षक येणार नाहीत तोपर्यंत आजोबा उपोषण करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याबरोबर आजोबांना गावकऱ्यांनी सुध्दा पाठींबा दिला आहे.
शाळेला शिक्षक मिळावे म्हणून आजोबा बसले उपोषणाला…
जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळावे या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील एक 72 वर्षीय वयोवृद्ध आजोबा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला गावक-यांनीही पाठिंबा दिला आहे. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सात वर्ग असताना चारच शिक्षक शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सातत्याने मागणी करूनही जिल्हा परिषदेने शिक्षकांची नेमणूक न केल्याने गावातील वयोवृद्ध अशोक घोडेराव या आजोबांनी आजपासून उपोषण सुरू केलंय. शाळेत शिक्षकांची नेमणूक करा अन्यथा मरेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार आजोबांनी केला आहे.
शासनाविरोधात गावबंद करून आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला
कोपरगाव तालुक्यातील आदर्श शाळा असलेल्या सोनेवाडी येथील विद्यालयात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आमची मागणी मान्य करावी अन्यथा शासनाविरोधात गावबंद करून आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आमची नावाजलेली शाळा आहे, आतापर्यंत इथून चांगले विद्यार्थी घडले आहेत.
मुलांच्या भविष्याचा विचार करुन जिल्हा परिषद शाळेत प्रत्येक वर्गाला एक शिक्षक असावा. एक शिक्षकाला दोन वर्गांना शिकवावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. आमची नावाजलेली शाळा आहे, आतापर्यंत इथून चांगले विद्यार्थी घडले आहेत. त्याचबरोबर यापुढे देखील चांगले विद्यार्थी घडतील अशी खंत अशोक घोडेराव यांनी बोलून दाखवली.