Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली!

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse Bhosari land) यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधातील अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

खडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली!
Follow us
| Updated on: Dec 13, 2019 | 10:18 AM

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse Bhosari land) यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse Bhosari land) यांच्याविरोधातील अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेला त्रयस्थ अर्जदाराचा हस्तक्षेप अर्ज पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना क्लीनचिट दिल्यानंतर दमानिया यांनी अर्ज केला होता.

दमानिया यांनी दीड वर्षांपूर्वी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो सत्र न्यायालयाने मंजूर केल्याने खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 9 जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना क्लीनचिट दिल्यानंतर, दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा दाखला देत त्याला आव्हान दिलं होतं. खडसे यांनी पदाचा गैरवापर करत जमीन पत्नी आणि जावयाच्या नावे विकत घेतल्याचा आरोप आहे.  यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार एका दिवसात झाला असून, याबाबतचे पुरावे दिल्याचं वकिलांनी न्यायालयात म्हटलं.

एसीबीकडून खडसेंना दिलासा

दरम्यान, गेल्या वर्षी मे 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचं नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला होता.

अंजली दमानियांची प्रतिक्रिया

“दीडवर्षापूर्वी मी अर्ज केला होता. आता या प्रकरणाला गती येईल अशी अपेक्षा आहे. खडसे वारंवार म्हणत होते की माझ्याविरोधात पुरावे द्या, काहीच सिद्ध झालेलं नाही. मात्र कुठलीच कारवाई झालेली नव्हती, कारवाईच थांबली होती. त्यांना मे महिन्यात क्लीनचिट मिळाली होती. त्यानंतर मी तातडीने एसीबी कोर्टात याचिका दाखल केली होती. आता माझी याचिका स्वीकारली आहे, त्यावर आता सुनावणी सुरु होईल”, असं अंजली दमानियाक यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.

भोसरी जमीन व्यवहारातील पैसे कसे आले, मंदाकिनी खडसे आणि शिरीष चौधरी यांच्या खात्यात पैसे कुठून आले? कोणत्या कंपन्यांमधून आले? याबाबतची तक्रार मी 2017 मध्ये दिली होती. त्यावर एसीबीने थातूर मातूर उत्तरं दिली होती.  यांच्या खात्यात ज्या कंपन्यांमधून पैसे आले, त्या कंपन्याच अस्तित्त्वात नव्हत्या. पूजेचं सामान विकणारं दुकान, काळबादेवीचं दुकान या पत्त्यावरुन कंपन्या दाखवल्या आणि त्यातून पैसे आले. या पैशातून भोसरी जमीन खरेदी झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र एसीबीने या कंपन्या तरी शोधल्या का? मी कंपन्या शोधू शकते तर तुम्ही शोधू शकत नाही का? एसीबीचं कार्यालय हा राजकीय अड्डा झाला आहे, त्याला कुलूप लावायला हवं”, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

काय आहे भोसरी जमीन खरेदी प्रकरण?

एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळचं हे प्रकरण आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करुन स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. या सर्व प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी.