भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, एकनाथ खडसे म्हणतात…

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिट्विट करत भाजपकडे दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. (Eknath Khadse Comment Raksha Khadse)

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, एकनाथ खडसे म्हणतात...
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 6:38 PM

जळगाव : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी मौन बाळगलं आहे. (Eknath Khadse Comment Raksha Khadse derogatory reference on BJP official website)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे महिनाभराच्या कालावधीनंतर बुधवारी (27 जानेवारी) रात्री मुंबईहून जळगावात परतले. एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी सुरु आहे. भोसरीच्या जमीन खरेदीसंदर्भात ईडी कार्यालयात चौकशी केली जात आहे. या चौकशीसाठी खडसे गेल्या महिनाभरापासून मुंबईत आहेत.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

बुधवारी मुंबईहून जळगावला परतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. ईडी चौकशी आणि रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख या दोन्ही प्रकरणी त्यांनी मौन बाळगलं. ‘नो कमेंट्स’ म्हणत ते जळगावातून मुक्ताईनगरच्या दिशेने रवाना झाले.

नेमकं प्रकरणं काय? 

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर याबाबतचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. स्वाती चतुर्वेदींचे ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिट्विट करत भाजपकडे दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल”, असं अनिल देशमुख म्हणाले.

काय म्हणाल्या रक्षा खडसे?

“भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर या विषयाबाबत मी तात्काळ पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही. माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आले, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरुन व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरु आहे” असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.

रक्षा खडसेंबाबत खरंच अपमानास्पद शब्द?

दरम्यान, भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्याबाबत अजूनही असा काही उल्लेख आहे का? याची शाहनिशा करण्यासाठी आम्ही याबाबत पडताळणी केली. मात्र, भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आम्हाला तसा काही उल्लेख आढळला नाही. कदाचित स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर बदल करण्यात आल्याची शक्यता आहे किंवा दुसरं काही कारण असण्याची शक्यता आहे. (Eknath Khadse Comment Raksha Khadse derogatory reference on BJP official website)

संबंधित बातम्या:

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कारवाईचा इशारा

चावटपणा करणाऱ्याला आत टाका, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप

वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख भाजपकडून नाही, रक्षा खडसेंचा दावा, पोलीस अधीक्षकांशी चर्चा

Non Stop LIVE Update
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.