नाराजी दूर झाली का? खडसे म्हणतात, त्याची चर्चाच झाली नाही!
भाजपमधील नाराजीनंतर आज जळगावात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse meet Devendra Fadnavis) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली.
जळगाव : भाजपमधील नाराजीनंतर आज जळगावात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse meet Devendra Fadnavis) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली. नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच आपले तिकीट कापल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी काल टीव्ही 9 मराठीवर (Eknath Khadse meet Devendra Fadnavis) केला होता. खडसेंच्या या गंभीर आरोपानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज तिघेही एकत्र पाहायला मिळाले.
जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. जळगावातील जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर ही मोठी राजकीय भेट झाली. यावेळी तिघांनीही एकत्र न्याहरी केली.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
दरम्यान, या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. तुमची नाराजी दूर झाली का असा प्रश्न विचारला असता, खडसे यांनी नाराजीबाबत काही चर्चा झाली नाही, आज केवळ जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाली, असं सांगितलं.
“जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाली. उमेदवार ठरवणं बाकी होतं. प्रदेशाध्यक्षांकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावं पाठवली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावावर चर्चा केली. नाराजीचा विषय वेगळा, हा विषय वेगळा आहे. आज केवळ उमेदवारीवर चर्चा झाली. उमेदवार ठरवले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्याला सभा आहे. तात्पुरते जळगावला थांबले. तिथून धुळ्याला गेले मग नंदुरबारला जातील. आजचा विषय केवळ अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीवर होता. आज आमची नाराजीबाबत चर्चाच झाली नाही, माझं पूर्वीपासून जे मत होतं, ते आजही कायम आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
गिरीश महाजन काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस पहाटे 4.30 ला जळगावात आले. फडणवीस हे धुळे आणि नंदुरबारला जाणार आहेत. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाली. याबाबत आमच्या तिघांची चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा झाली. आम्ही एक आहोत, एकत्र निवडणुकीला सामोरे जाऊ, असं गिरीश महाजन यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.
मी टोकाचं बोललो नव्हतो असं खडसे साहेबांनी काल सांगितलं होतं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असं खडसेंनी सांगितलं, मलाही ते बोलले. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत कोअर कमिटीची बैठक झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडणुकीबाबत आम्ही एकमताने नावं ठरवली आहेत, असंही महाजन यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
जळगावात मोठी भेट, खडसे-फडणवीस-महाजनांची बैठक, खडसेंच्या आरोपानंतर तिघांची एकत्र न्याहरी