एकनाथ खडसेंच्या आदेशानेच माझा राष्ट्रवादीत प्रवेश, माजी आमदाराचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे यांच्या आदेशाने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, असा गौप्यस्फोट माजी आमदार उदयसिंह पाडवी यांनी केला आहे.

एकनाथ खडसेंच्या आदेशानेच माझा राष्ट्रवादीत प्रवेश, माजी आमदाराचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 5:48 PM

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरु असताना माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, असं सांगत राजकीय वर्तुळामध्ये त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. (Eknath Khadse Suggest Udyasinh padvi To Join NCp)

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यातच आता माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार उदयसिंह पाडवी म्हणाले, “ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”. एकनाथ खडसेंनी देखील आपण त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सुचवलं असल्याचं मान्य केलं आहे. अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी एकप्रकारे भाजपला इशाराच दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे एकांतवासात आहेत. विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारण्यापासून ते अगदी भाजपच्या राष्ट्रीय कार्याकारिणीत स्थान न मिळणे या साऱ्या प्रकाराने खडसे व्यथित झाले आहेत. त्यांनी त्यांची उद्विग्नता अनेक वेळा जाहीर सभांमधून आणि माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. तसंच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांचं खंडन देखील करत नाहीत. यावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांची आणि राष्ट्रवादीची सलगी दिसून येते.

उदयसिंह पाडवी यांना खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सांगितलेच आहे पण आणखी किती नेत्यांना आणि आमदारांना खडसेंनी पक्षांतराचा सल्ला दिलाय, हे देखील औत्सुक्याचं आहे. याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

उदयसिंह पाडवी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार उदयसिंह पाडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पाडवी यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं.

खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र, खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील म्हणाले होते.

(Eknath Khadse Suggest Udyasinh padvi To Join NCp)

संबंधित बातम्या

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा

एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित, पदावर बोलणी सुरु, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.