मुंबईः महाराष्ट्रातील विधान सभेच्या निकालानंतर (Vidhan Sabha Result) घडलेल्या राजकीय नाट्यात तासातासाल वेगवेगळ्या घटना घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजी नाट्यानंतर ज्या 35 आमदारांना सूरतमधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे त्या आमदारांना आता आसामधील गुवाहाटीध्ये एअरलिफ्ट केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ माजली आहे. त्या 35 आमदारांपैकी 33 आमदारांची (33 MLA) यादी आता समोर आली आहे. महाविकास आघाडीचे घटन पक्ष असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचाही एक आमदार या आमदारांमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे.
या आमदारांना आता आसमामधील गुवाहाटीमध्ये हलवण्यात येणार असून त्यांना आता सूरतमधील विमानतळावर हलवण्याची तयारी सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांनी ज्या 35 आमदार आपल्यासोबत आहेत असा दावा केला होता, त्यातील दोन आमदारांमुळे या नाराज नाट्यत आणखी एक आमदारांचे नाराजी नाट्य असल्याचे सांगितले जात आहे. यामधील संतोष भोसल यांनी लघुशंकेचे कारण सांगत आणि इतर वाहनांचा आधार घेत त्यांनी मुंबई गाठली तर नितीन देशमुख यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितीन देशमुखांच्या तब्बेतीमुळे त्यांची पत्नी प्रांजल देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केला आहे.
नितीन देशमुख आणि संतोष भोसले या दोन आमदारांना सोडून एकनाथ शिंदे ज्या आमदारांना घेऊन ते आसामला घेऊन जात आहेत, त्यांची नावे समोर आली आहे. त्यामधील एकूण 33 आमदार असल्याची माहिती सांगण्यात येत असून त्यामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचाही एक आमदार असल्याने खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या यादीनुसार शिंदे यांच्यासह एकूण 33 आमदार सध्या सूरतमध्ये आहेत. त्यामधील आमदारांच नावं पुढीलप्रमाणे; महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभूराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, रमेश बोरणारे, तानाजी सावंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख, प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहास कांदे, संजय सिरसाट, प्रदीप जैस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे, विश्वनाथ भोईर, राजकुमार पटेल, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर,चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनावणे, यामिनी जाधव,बालाजी किनिकर.
या आमदारांचा समावेश एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांबरोबर आहे. मंत्री बच्चू कडू हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्याने आणि तीन पक्षातील इतर कोणीही आमदार सोबत नसताना फक्त प्रहार संघटनेतील आमदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला कसा लागला याविषयी जोरदार चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रहार संघटेविषयी अनेक वेगवेगळे सवाल उपस्थित केले आहेत.