Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांशी फोनवरुन संवाद, बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात, शिवसेनेची डरकाळी

शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावातील शिवसैनिकांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात येईल, अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांना आश्वस्त केलं.

एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांशी फोनवरुन संवाद, बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात, शिवसेनेची डरकाळी
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 5:23 PM

बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली 62 वर्षे सीमावासियांना लढा सुरु आहे. या लढाच्या पार्श्वभूमीवर आज 1 नोव्हेंबरला मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावातील शिवसैनिकांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात येईल, अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांना आश्वस्त केलं. (Eknath Shinde Call Shivsainik and assure him the border With belgaum wil Soon in maharashtra)

आज बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यास कर्नाटक पोलिसांनी मनाई केली. बेळगाव इथल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात निषेधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आला. शिवसेना कार्यालयाबाहेर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. याच एकंदर परिस्थितीची माहिती एकनाथ शिंदे यांनी तेथील शिवसैनिकांकडून घेतली.

बेळगावातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना न्यायालयात योग्य बाजू मांडण्याची विनंती केली. मंत्री शिंदे यांनीही राज्य सरकार आपल्या बांधवांशी खंबीरपणे उभा आहे. लवकरच आपला संघर्ष संपुष्टात येऊन बेळगावसह सीमा भाग महाराष्ट्रात असेल, असा विश्वास शिवसैनिकांना दिला.

1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक सरकारकडून राज्योत्सव साजरा केला जातो. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज काळा दिवस पाळला जातो. मात्र, यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळं कर्नाटक सरकार आणि पोलिसांनी मराठी भाषिकांवर दमदाटी सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय राहणार नाही – अजित पवार

सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला पाठिंबा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा असल्याचं अजित पवार म्हणाले.

आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात – जयंत पाटील

“आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल”, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.  राज्यातील जनता सीमा भागातील मराठी भाषिक लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असलं तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अन्याय थांबलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा निषेध नोंदवत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

(Eknath Shinde Call Shivsainik and assure him the border With belgaum wil Soon in maharashtra)

संबंधित बातम्या

मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय राहणार नाही : अजित पवार

सूर्य चंद्राचे ज्ञान शिकवू नका, संजय राऊतांनी बेळगावप्रश्नावरुन कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले

कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.