Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त झाली महाराष्ट्र विरोधी आघाडी, काय म्हणाले एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या रत्नागिरी मतदार संघात जाहीर सभा घेतली. या वेळी राजन साळवी आणि इतर कोकणातील नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रामदास कदम यांच्या मतदार संघात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.

होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त झाली महाराष्ट्र विरोधी आघाडी, काय म्हणाले एकनाथ शिंदे
eknath shinde
Follow us
| Updated on: Feb 15, 2025 | 4:41 PM

सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. लोकांना सोन्याचे दिवस दाखविण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. आमची सुरुवात अडीच वर्षांपूर्वी झाली. तो वेग आता आपल्याला दाखवायचा आहे. आता आम्ही घरात बसून सरकार चालवले नाही, लोकांसाठी रस्त्यावर फिरलो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आम्ही विकासाची कोणती योजना बंद करणार नाही.आम्ही खोटी आश्वासने देत नाही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. आम्ही पूर्ण विचार करून योजना केल्या आहेत असेही शिंदे यांनी सांगत लाडकी बहिण यासह इतर योजना सुरुच राहतील हे स्पष्ट केले आहे.

सर्व योजना सुरु राहणार

रत्नागिरीतील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांच्या मतदार संघात सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की होती दाढी होती म्हणून तुमची उद्धवस्त झाली  महाराष्ट्र विरोधी आघाडी. आणि सुरू झाली विकासाची आघाडी. कशाला माझ्या नादाला लागता. मी कुणाच्या नादी लागत नाही. मी आरोपाला उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर देतो. विकासाची कोणतीही योजना बंद होणार नाही. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. आम्ही पूर्ण विचार करून योजना केल्या आहेत.

‘रश्शी जळाली पण पिळ जात नाही’

राजकारणात पदं वर खाली होतात. पण एकनाथ शिंदे यांना ‘लाडका भाऊ’ ही नवीन ओळख मिळली. ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे. याचं मला समाधान आहे. मला अभिमान आहे. माझ्या रक्तातील थेंब असे पर्यंत महाराष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करेल. खोके खोके बोलत असतात. या महाराष्ट्राने तुम्हाला घरी बसवलं. तरीही त्यांना कळत नाही. ‘रश्शी जळाली पण पिळ जात नाही’ अशी यांची अवस्था आहे असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी टीका करताना म्हटले.

हे सुद्धा वाचा

दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका

कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम असं म्हणायचे. आम्ही करून दाखवलं. आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. किती शिव्या देणार, किती आरोप करणार. माझा सत्कार झाला. महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार झाला. महाराष्ट्राला अभिमान आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करा. आरोप करा. शिव्या द्या. पण तुम्ही महादजी शिंदेंचा अपमान करता., साहित्यिकांना दलाल म्हणता, ज्यांनी एकेकाळी तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान करता. काही जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. माझ्यावर कितीही आरोप करा. कितीही शिव्या द्या. माझ्या मागे लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी आहेत, तोपर्यंत मला चिंता नाही. मी कुणाला घाबरत नाही असाही टोला शिंदे यांनी लागवला.

.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.