होती दाढी म्हणून उद्धवस्त केली महाविकास आघाडी, एकनाथ शिंदे यांची तूफान टोलेबाजी
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे थाटामाटात संपन्न झाला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदान झाला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांची खच्चीकरण होऊ नये म्हणून आम्ही उठाव केल्याचे सांगितले. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार ते विसरले. बाळासाहेब म्हणाले अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केला नसता तर शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं,सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता असेही एकनाथ शिंदे यांनी आपल्या उठावामागचे कारण केले.
जर आम्ही उठाव केला नसता तर आपला महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. महाराष्ट्र मागे गेला होता. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही अडीच वर्षांत महाराष्ट्र नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. महाविकास आघाडी असताना सरकार तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्यात आपण पहिल्या नंबरवर राज्य आणलं असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की कोविडला घाबरून घरात बसलेला मी मुख्यमंत्री नाही. तर रस्त्यावर येऊन लढणारा हा मुख्यमंत्री आहे असेही ते म्हणाले.
माझी दाढी खुपतेय
सरकार घालवलं नसतं तर योजना आल्या नसत्या. उद्योग आले नसते. लाडकी बहीण योजना आली नसती. बहिणींना सन्मान मिळाला नसता. तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती. पहिल्या अडीच वर्षात काय झालं महाीत आहे. कसं होणार?. कारण त्या अडीच वर्षात महाराष्ट्र विरोधी विकास आघाडी राज्यात सत्तेवर होती. दिसेल ते काम बंद करण्याचं काम केलं. मेट्रो,बुलेट, कारशेड, जलयुक्त शिवार याला ब्रेक लावला. जिथे नव्हता ब्रोकर तिथे टाकले स्पीड ब्रेकर. असं यांचं काम होतं. आम्ही हे स्पीड ब्रेकर उखडून टाकलं. ज्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले ते सरकारच उखडून टाकलं. माझी दाढी खुपतेय. अरे होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि विकासाची जोरात वाहू लगाली गाडी. ही दाढीची करामत आहे. म्हणून सांगतो मला हलक्यात घेऊ नका असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.