ठाणे : जिल्ह्यातील दिव्यांग बालकांना दिव्यांगमुक्त करण्याचा निर्धार ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाने केलाय. या योजनेसाठी ज्युपिटर रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्यात येणार आहे. रुग्णालयात दिव्यांग बालकांसाठी मोफत कॉकलीअर इम्प्लांटचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारची योजना सुरु करण्यात आलीय. या योजनेचा शुभारंभ नगसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पालक आणि मुलांना शिंदे यांनी भेट दिलीय. (Eknath Shinde inaugurated the scheme for Jupiter Hospital in Thane for disabled children)
जन्मताच दिव्यांग असलेल्या बालकाला वेळेत उपचार मिळाल्यास त्याचे दिव्यांगत्व दूर करता येते. अशा बालकांवर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत आहे. ज्युपिटर रुग्णालयात अशा दिव्यांग बालकांचे डायग्नोसिस आणि नंतरची सर्जरीही मोफत स्वरुपात करण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग मुलांच्या पालकांना इतर मुलांप्रमाणे त्यांच्या बाळाला बोलता येणार आहे. तसंच आपल्या पालकांचा आवाज त्या बालकांपर्यंत पोहोचणार आहे. या योजनेचा फायदा मूकबधिर मुलांच्या पालकांनी घेण्याचं आवाहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.
स्वप्निल लोणकरबाबत झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. अशाप्रकारच्या घटना होऊ नये यात राज्य सरकार पूर्णपणे गंभीर आहे. याबाबत ज्या उपाययोजना करायच्या असतील त्या राज्य सरकारच्या माध्यमातून केल्या जातील, असं आश्वासन शिंदे यांनी दिलंय.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. तसंच कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत होतं. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा यासाठी एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत या नवीन योजनेचा शुभारंभ केला होता. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते पार पडलं होतं.
एमएमआर रिजनमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत होता. ही गरज लगेचच्या लगेच भरून काढता येणं अवघड होतं. अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी शिंदे यांनी या ऑक्सिजन बॅंकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला. या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेच्या 120 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असले तरी कालांतराने दहा लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येतील, असं शिंदे यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
हिंदमाताजवळ पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होणार, आदित्य ठाकरेंकडून कामाची पाहणी#AdityaThackeray #BMC #MumbaiRains #Hindmata #MumbaiMonsoon #Monsoon2021 https://t.co/Durie9ti31
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2021
संबंधित बातम्या :
पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाडं लावली जाणार, भाजप खासदार गोपाळ शेट्टींचा संकल्प
Eknath Shinde inaugurated the scheme for Jupiter Hospital in Thane for disabled children