एकनाथ शिंदे बॉम्ब टाकणार की बॅकफूटवर जाणार? थोड्याच वेळात मांडणार भूमिका; अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे. घडामोडींना वेग आला असून, थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी शिंदे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे बॉम्ब टाकणार की बॅकफूटवर जाणार? थोड्याच वेळात मांडणार भूमिका; अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 2:33 PM

विधानसभा निवडणुकीमध्ये  राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडील मोठा धक्का बसला आहे. तब्बल 230 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीला मात्र तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या, महाविकास आघाडीच्या वाट्याला मोठा पराभव आला आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक 132 जागा जिंकत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर शिवसेना शिंदे गटला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार?

मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं अशी मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान थोड्याच वेळात आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते आपली मुख्यमंत्रिपदाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या पत्रकार परिषदेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.  एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडणार? मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की, काही वेगळा निर्णय घेणार हे पहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजप हा या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं राज्यात तब्बल 132 जागा जिंकल्या एकटा भाजप पक्ष बहुमतापासून आता अवघ्या काही जागा दूर आहेत. त्यात काही अपक्ष उमेदवारांनी देखील भाजपला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे काही अपक्ष उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांना देखील पाठिंबा दिला आहे. मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचं संख्याबळ भाजपच्या तुलनेत खूप कमी आहे, त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.