Dasara Melava 2023 : एकनाथ शिंदे हाच मोठा घोटाळा आहे, उद्योग मंत्री यांचा डांबर घोटाळा, संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Oct 24, 2023 | 9:06 PM

पुढल्या वर्षी 2024 ला पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा आहे. मागच्या मेळाव्याला माझी खुर्ची रिकामी होती. मी उपस्थित नव्हतो. मी तुरुंगात होतो. 100 दिवस तुरुंगात राहिलो. पण. हा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक मोडला नाही, खचला नाही, तुटला नाही, माघार घेतली नाही. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केले असेही ते म्हणाले.

Dasara Melava 2023 : एकनाथ शिंदे हाच मोठा घोटाळा आहे, उद्योग मंत्री यांचा डांबर घोटाळा, संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
SANJAY RAUT
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 24 ऑक्टोंबर 2023 : शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत. मेळावा एकच शिवतीर्थावरचा. दुसरा मेळावा आहे त्याकडे मी ढुंकूनसुद्धा बघत नाही. हा महाराष्ट्र ढुंकून बघत नाही. डुप्लिकेट चायनीज माल येतो आणि जातो. हा चायनीज मालाचा फटाका कधी फुटत नाही. इकडे मराठा तितुका मेळावा सुरु आहे आणि तिकडे मराठा तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठा माणसांमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुकडे करायचे सुरु आहे. महाराष्ट्राचे शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाची एकजूट उभी केली ती तोडण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा शिवसेनेचा मेळावा इथे सुरु आहे आणि तिकडे सुरू आहे भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या पक्षाचा मेळावा अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान ते रोज म्हणतात. किसी भ्रष्टाचारी को नही छोडूंगा. फिर क्या करोगे भाई सब को पकड के? महाराष्ट्र मे मंत्री बना दूंगा. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रावर राज्य करतो आहे आणि या महाराष्ट्राचे नुकसान करतो. त्यांचे गृहमंत्री अमित शहा दोन दिवसापूर्वी छत्तीसगडला गेले. छत्तीसगडला निवडणुका आहेत. पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्या पाचही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होतोय हे लिहून घ्या. त्यांनी काय सांगावं? जर छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आलं तर घोटाळेबाज आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना अटक करणार. अरे भाऊ! तुम्ही भ्रष्टाचारांना अडकवण्याची भाषा करता. मग बघा ते त्या चाळीस आमदारांचं. आम्ही तुमचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा. पंतप्रधान मोदी सांगतात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा आणि पंचवीस हजार कोटीचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा. कॅह्र दिवसांनी अजित पवार सत्तेत सामील होतात. भोसले यांचा साखर कारखान्यामध्ये दोनशे कोटीचा घोटाळा. प्रफुल पटेल जमीन खरेदी केली. हे म्हणतात भ्रष्टाचारांना सोडणार नाही. चांगला चालणारा साखर कारखाना या माणसाने पाचशे कोटी भ्रष्टाचार करून बुडवलेला आहे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून एक घोटाळा समोर आलाय. उदय सामंत यांनी शंभर कोटीचा डांबर घोटाळा केलंय. डांबर घोटाळा? काय केले? रस्त्याची कामे दाखवून 100 कोटी लुटले. महाराष्ट्र लुटण्याचं काम हे सरकार करत आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

2024 ची वाट पहा. भाजप सरकार आता वाघ नखांचा घोटाळा करत आहे. छत्रपतींच्या नावाने वाघ नखे आणतायत. त्या वाघ नखांविषयी कोणाला काही माहीत नाही. ही वाघ नखे महाराष्ट्र सोळा नोव्हेंबरला येतात. येऊ द्या. आम्ही त्यांचे स्वागत करू. पण, या महाराष्ट्राची खरे वाघ समोर बसले आहेत. लाखोंच्या संख्येने ही वाघ 2024 आली तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळ्यांनी सज्ज असायला पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला महाराष्ट्र पाप मुक्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.