Eknath Shinde Press Conference LIVE : देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा, एकनाथ शिंदे म्हणाले..
Eknath Shinde Press Conference LIVE Updates : राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. पण त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. केंद्रीय नेते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
‘हा पराभव आम्हाला मान्य नाही’, थोरातांची पुन्हा ईव्हीएमवर शंका
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. हा पराभव आम्हाला मान्य नाही. या निवडणुकीत अनेक लोकांनी आम्हाला मतदान केलं. ते लोक मला येऊन भेटत आहेत, आम्ही तुम्हाला मतदान केल्याचं सांगत आहेत. त्यामुळे यापुढे बॅलेट पेपर वर निवडणूक व्हावी अशी आमची मागणी आहे, असं थोरात यांंनी म्हटलं आहे.
-
देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री बनवण्यासाठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा शिवसेनेचा पाठिंबा असेल. आमची बैठक होणार आहे. भाजपची बैठक होणार आहे. त्यात ते निर्णय घेतील. कोंडी, अडसर, नाराजी नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही. नाराजी नाही. जो निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतील त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदासाठी दावा आणखी पक्का झाला आहे.
-
-
पंतप्रधान मोदी यांना फोन करू सांगितलं की माझ्यामुळे अडचण येणार नाही- एकनाथ शिंदे
मी पंत्रप्रधान मोदी यांना फोन करून सांगितलं की,माझ्यामुळे सरकार बनवण्यात कोणतीही अडचण येणार आहे. मी त्यांना सांगितलं की, जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. माझ्यामुळे अडचण आहे असं मानू नका.
-
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद सोडण्याचे संकेत
एकनाथ शिंदें यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कुठेही मुख्यमंत्रीपदाचा दावा केलेला नाही. अडीच वर्षांच्या प्रवासाबाबत मी समाधानी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री होणार नाही हे संकेत त्यांनी दिले आहेत.
-
मी कालही कार्यकर्ता होतो. आजही आणि उद्याही, मी स्वत:ला मुख्यमंत्री मानलं नाही- एकनाथ शिंदे
मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. मुख्यमंत्री असतानाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून असेल. मी सामन्य लोकांसाठी काम केलं आहे. अडीच वर्षाच्या कालावधीत आम्ही चांगलं काम केलं. माझ्या कामाबद्दल मी समाधानी आहे. आम्हाला मोदी आणि शाह यांचं पूर्ण पाठबळ होतं. आम्ही सरकार बदललं आणि उठाव केला तेव्हा अमित शाह पाठिशी होते. ते अडीच वर्ष माझ्यापाठी होते. मला सुरुवातीचे दिवस आठवतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक दिवसाचा वापर राज्यासाठी केला.
-
-
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले जनतेचे आभार
महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. असा विजय यापूर्वी कधी मिळाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण जनतेचे आभार व्यक्त करतो. महायुतीवर जनतेने विश्वास दाखवला. मी 80 ते 100 सभा घेतल्या.
-
राज्यात राजकीय घडामोडींना वेग, शिवसेना खासदार घेणार अमित शाहांची भेट
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे. एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, दिल्लीत शिवसेनेचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार आज दुपारी चार वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसद भवनातील कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सर्व खासदारांना सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, नागपुरात भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषद घेणार आहेत.
-
-
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेला उशीर, नेमकं काय घडतंय?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. ठरलेली वेळ निघूनही पत्रकार परिषद होत नसल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंद यांना मुख्यमंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संजय शिरसाट, दादा भुसे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
-
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, दोन मिनिटं थांबा…
काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून आहे. असं असताना एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना आमदार एकत्र येत आहेत. नुकतंच प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदेंच्या घरी पोहोचले आहे. याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, दोन मिनिटं थांबा सर्वकाही स्पष्ट होईल.
-
मुख्यमंत्री पदासंदर्भात एकनाथ शिंदेचे मत काय?
मुख्यमंत्री पदासोबतच इतर अनेक मुद्यांवर एकनाथ शिंदे हे त्यांची भूमिका मांडतील. अगदी थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होत आहे.
-
उद्या महायुतीची दिल्लीत बैठक
उद्या महायुतीची दिल्लीत बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उद्या दिल्लीत असतील. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि पुढील सरकारविषयी भूमिका ठरवण्याची येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
एकनाथ शिंदेंनी दाढीवरून हात फिरवला म्हणजे बातमी मिळेल -संजय शिरसाट
एकनाथ शिंदे आज काय भूमिका मांडतील हे मला माहिती नाही. पण त्यांनी दाढीवरून हात फिरवला म्हणजे बातमी मिळेल असे संकेत संजय शिरसाट यांनी दिली.
-
संसद भवनात इंडिया आघाडीची बैठक
ईव्हीएमविरोधात ठोस भूमिका घेण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक होत आहे. आज संसद भवनात इंडिया आघाडीचे नेते भेट घेणार आहेत.
-
एकनाथ शिंदे ॲक्टिव्ह मोडवर
एकनाथ शिंदे आज ठाण्यात आणि संध्याकाळी मुंबईत आमदारांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपासून शिंदे यांनी भेटीगाठी नाकारल्या होत्या. आता दुपारनंतर एकनाथ शिंदे ठाण्यात काही आमदारांना भेटणार आहेत. यानंतर ६ वाजता ते वर्षा बंगल्यावर येणार आ
-
सरसंघचालक-अमित शहा यांच्यात भेट
सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट झाली. सोमवारी रात्री दिल्लीत भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र निकालानंतर भेटीला महत्व आले आहे.
-
संजय केळकर यांच्यासाठी देवीला साकडे
ठाणे शहर विधानसभा मतदार सघातील भाजपचे आमदार संजय केळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी ठाण्यातील घंटाळी देवी मंदिरात भाजप युवा मोर्चाचे सुरज दळवी आणि कार्यकर्त्यांसमवेत साकडे घालत देवीची पूजा अर्चा करण्यात आली.
-
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात? त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
-
नागपुरात फडणवीस, शिंदे यांच्यासाठी महारुद्राभिषेक
नागपुरात भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी महारुद्राभिषेक करण्यात आला. तसेच शिवसेना शिंदे गटच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिव मंदिरात दुग्धभिषेक केला.
-
जळगावात सोन्याचे दर घसरले
जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. यामुळे सराफा दुकाने ग्राहकांनी गजबजली. सोन्याच्या दरात १ हजार ४०० तर चांदीच्या दरात १ हजार ५०० ने झाली घसरण झाली.
-
एकनाथ शिंदेंसाठी विठ्ठलाला दुग्धाभिषेक
मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची निवड व्हावी यासाठी पंढरपुरात विठ्ठल मंदिरासमोर भजन करत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्याने महायुतीला चांगले योगदान मिळाले असल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच असावेत यासाठी शिवसेना शहराध्यक्ष मुन्ना भोसले यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलाला घालण्यात आले.
-
ईव्हीएम मशीन विरोधात सांगलीत आंदोलन
ईव्हीएम मशीन विरोधात सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा देखील काढण्यात आला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन देखील केली आहे.
-
प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन
ईव्हीएम मशीन विरोधात सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा देखील काढण्यात आला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन देखील केली आहे.
-
नंदुरबार जिल्ह्यात पालकमंत्री पदावरुन बॅनर वॉर
राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तार होत नाही, तोवर जिल्ह्यात पालकमंत्री पदाचे बॅनर झळकले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री असल्याचे बॅनर शहरात झळकले आहेत. राज्यात एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार यावर निर्णय झाला नाही, मात्र नंदुरबार जिल्ह्यात पालकमंत्री पदावरुन बॅनर वॉर सुरू झालं आहे.
-
आता एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा – भाजपा खासदार
“2019 ला लहान भावाला आम्ही सिंहासनावर बसवलं. आता एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. महायुतीत सर्व समन्वयाचं वातावरण आहे. जनतेने आम्हाला जास्त जागा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही देवाला प्रार्थना करत आहोत. देवेंद्र फडणवीस अडचणीच्या काळात धावून जाणारे नेते आहेत” असं भाजप राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे म्हणाले.
-
महायुती फेव्हिकॉलचा जोड – भाजपा पुणे शहराध्यक्ष
“जनसामान्यांच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे. यासाठी पुण्यातील सर्वात जुने मंदिरात असलेल्या सारसबागेतील श्री सिद्धिविनायक गणेशाच्या चरणी आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं आहे. इव्हीएम मशीन विरोधात विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. विरोधकांना आता पाच वर्ष आक्षेप घेण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही. महायुती फेव्हिकॉलचा जोड आहे तो कधीच तुटणार नाही” अशी प्रतिक्रिया भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली
-
देवाच्या आळंदी मध्ये 23 तारखेपासून कार्तिकी सोहळ्याला सुरूवात
आळंदी,पुणे – देवाच्या आळंदी मध्ये 23 तारखेपासून कार्तिकी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यानिमित्त राज्यभरातून जवळपास 2 ते 3 लाख वारकरी भाविक आळंदी मध्ये दाखल. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. उद्या 28 तारखेला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीतर्फे मंदिरावर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली .
-
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल
देवेंद्र पडणवीस यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ हे सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यापूर्वी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती.
-
मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच दिल्लीत सुटण्याची शक्यता
मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच दिल्लीत सुटू शकतो. आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.
-
गौतम अदानींना अटक केली पाहिजे – राहुल गांधी यांची मागणी
गौतम अदानींना अटक केली पाहिजे. ते स्वत:वरील आरोप कधीच मान्य करणार नाहीत. त्यांच्यावर अमेरिकेत अनेक आरोप आहेत, अदानी जेलमध्ये असले पाहिजेत, सरकार त्यांना वाचवतंय – राहुल गांधी यांची टीका.
-
संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मतांच्या बेरजेत झालेल्या घोळाच्या संदर्भात रोहित पवारांकडून ट्विट
संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मतांच्या बेरजेत झालेल्या घोळाच्या संदर्भात रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आलं आहे.
कन्नड विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार संजना जाधव यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही एकूण मतदानाच्या कित्येक पटींनी मोठी आहे. यावर टीका करताना आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत टीका केली आहे. गुजराती ईव्हीएम च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकले आहे का असा सवाल उपस्थित केला आहे?
#EVM मध्ये घोळ ही महाराष्ट्राच्या जनतेची शंका आता वस्तुस्थितीत बदलत आहे ? त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कन्नड मतदारसंघ ….
गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का ?#MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/uBagdal05A
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 27, 2024
-
करावं तसं भरावं, हे विरोधकांच्या नशिबी आलंय – संजय शिरसाट
आमच्या कुणाच्याही तंगड्यात तंगड्या अडकलेल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस , अजित पवार आणि एकनाथ शिंदे सगळेजण निवांत आहेत. संजय शिरसाट यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर .
-
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक संत्रा बागेत पडून आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार, अचलपूर ,वरुड ,मोर्शी तालुक्यात सर्वाधिक संत्र्याचं उत्पादन केलं जातं. बाजारपेठेमध्ये संत्र्यांची मागणी घटली आहे. दुसरीकडे मागील वर्षीचा गारपिटीचा तीन कोटी रुपयांचा विमा कंपनीकडे थकीत आहे.
-
धाराशिव- श्री तुळजाभवानी मंदिर नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात
धाराशिव- श्री तुळजाभवानी मंदिर नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंदिरातील पुरातन दगडावर नंबर टाकण्याचे काम सुरु झाले आहे. एकूण ५८ कोटी १२ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पुढील दोन टप्प्यांच्या कामाबाबत उद्या मिटींगमध्ये नियोजन होणार आहे. मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली.
-
पराभव स्वीकारुन आत्मचिंतन करा; बावनकुळेंचा विरोधकांना टोला
“नांदेडमध्ये ईव्हीएम चांगलं होतं. नांदेडमध्ये आम्ही 1500 मतांनी हरलो. तुम्ही जिंकलात. खरंच हा खोटारडेपणा आहे. पराभव स्वीकारुन आत्मचिंतन करा. आम्ही लोकसभेला हरल्यानंतर आत्मचिंतन केलं, शिकलो, त्यातून पुढे गेलो. बूथवर काम केलं. मतदान केंद्रापर्यंत जाऊन जनतेला भेटलो. मतांची टक्केवारी वाढली,” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
-
शिंदेंनी बंड केलं नसतं तर भाजप सत्तेत आलं नसतं- बच्चू कडू
“एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळेच याआधी भाजप सत्तेत आले. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर भाजप सत्तेत आलं नसतं. याचं सगळं श्रेय एकनाथ शिंदे यांना जातं. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर लाडकी बहीण योजना आली नसती. तुम्हाला एकनाथ शिंदेंमुळे ही योजना मिळाली म्हणून भाजपचे लाडके भाऊ आता सत्तेत आले आहेत. त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे यांना दुर्लक्षित करता येणार नाही,” असं बच्चू कडू मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले.
-
या निवडणुकीत धर्माचा झेंडा जिंकला अन् सेवेचा झेंडा हरला- बच्चू कडू
“जाती आणि धर्माचं फॅक्टर महत्त्वाचं ठरलं. धर्माचा झेंडा जिंकला आणि आमच्या सेवेचा झेंडा या निवडणुकीत हरला. झेंडे जिंकले सेवा हरली. कुठल्याही निवडणुकीत पारदर्शकता असली पाहिजे. EVM मध्ये पारदर्शकता नाही. जगातील सगळे देश बँलेटवर जर निवडणुका घेत असतील तर भाजप का म्हणत नाही आम्ही बॅलेटवर निवडणुका घेऊ? मला पाडण्याचं श्रेय घेणाऱ्याना सांगतो की तुमची बच्चू कडूला पाडण्याची औकात नाही. मला पाडण्याचं जे श्रेय राणा घेत आहेत, त्यांची ती ताकद नाही,” असं बच्चू कडू म्हणाले.
-
अंधेरीतल्या वीरा देसाई रोडवरील इमारतीला लागलेली आग आटोक्यात
मुंबईतील अंधेरी पश्चिम वीरा देसाई रोडवरील एका इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेआठ वाजता आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोणीही जखमी झाले नाही.
-
Maharashtra News: नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक
निवडणुकीच्या पराभवावर बैठकीत करण्यात आली चर्चा… शिवसेना मध्यवर्तीय कार्यालयात बैठक संपन्न मात्र बैठकीत प्रसार माध्यमांना करण्यात आली मनाई… येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्यासाठी ठरवण्यात आली रणनीती… नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक… नाशिक जिल्ह्यात ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्व उमेदवार पराभूत… ठाकरे सेनेच्या पदाधिकारी बैठकीत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मोठी आर्थिक उलाढाल आणि ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा ठेवण्यात आला आरोप… महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरही ठाकरे गटाची नाराजी
-
Maharashtra News: नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी होण्याची शक्यता
महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र व्यवहार करत केली होती मागणी… एकूण असलेल्या बूथ पैकी पाच टक्के बूथ वरील फेर मतमोजणी होण्याची शक्यता… फेर मतमोजणीसाठी एक बुथसाठी 40 हजार रुपये शुल्क आणि GST भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सुधाकर बडगुजर यांना पत्र… मतमोजणीनंतर अनेकांनी ईव्हीएम मशीनवर केली होती शंका उपस्थित… याच मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी देखील फेर मतमोजणीची केली आहे मागणी…
-
Maharashtra News: बंडखोर आता दिल्लीतल्या नेत्यांना घाबरत नाहीत – संजय राऊत
बंडखोर आता दिल्लीतल्या नेत्यांना घाबरत नाहीत… सरकार स्थापनेबाबत अद्यापही संभ्रमच.. 26 तारखेची मुदत उलटून गेली… भाजपनं तयार केलेले बंडखोर त्यांच्याच नेतृत्वाला आव्हान देत आहेत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…
-
Maharashtra News: पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं व्हावे लाडल्या बहिणींची मागणी
जळगावच्या मुक्ताईनगरात असंख्य लाडक्या वहिनींनी एकत्र येत नागेश्वर मंदिरात घातलं देवाला साकडं… केला दूध अभिषेक… लाडक्या बहिणींनी एक मुखाने केली मागणी, पुन्हा मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे व्हावे….
-
मटारच्या दरात घट
नवी मुबंईच्या Apmc बाजारात मटारच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. दरही निम्म्यावर आले आहेत. Apmc बाजारात हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झाला असून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रतिकिलो शंभरी पार केलेल्या हिरव्या वाटाण्याचे दर निम्यावर उतरले आहेत. मागील आठवड्यात घाऊक बाजारात प्रतिकिलो १००-१२० रुपयांवरून उपलब्ध असलेला वाटाणा आता ६०-७० रुपयांवर विक्री होत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही वाटाणा आवाक्यात आहेत.
-
आशियाई सिंह बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणखी आशियाई सिंह दाखल होणार आहेत. गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणखी दोन आशियाई सिंह मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी आणण्यात आली होती. सिंहांच्या बदल्यात, SGNP सक्करबाग प्राणीसंग्रहालयाला वाघांची जोडी देईल. आशियाई सिंह प्रदर्शन आणि प्रजननासाठी आणले जात आहेत.
-
सोने चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात १ हजार ४०० तर चांदीच्या दरात १ हजार ५०० ने घसरण झाली आहे. सोमवारी रोजी सोने एक हजार ३०० रुपयांनी तर चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांची घसरण झाली होती. दोन दिवसांत मिळून सोने व चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू २ हजार ७०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. सोन्याचे दर ७६ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर तर चांदी ८९ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. ऐन लग्न सराईत सोन्या चांदीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी म्हणून आमदारांची फिल्डिंग
पुण्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळालं आहे. पुणे जिल्ह्यातील २१ पैकी १८ जागा महायुतीला तर केवळ दोन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंत्रिपदावर वर्णी लागावी, यासाठी भाजपसह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील इच्छुकांची संख्या वाढली आहे. महायुतीत कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार, याचे सूत्र अद्यापही निश्चित झालेले नसताना आपल्या आमदाराला मंत्रिपद मिळावं, यासाठी जुळवणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून खलबतं सुरू आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष आहे. काल 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपला. त्यानंतर आता महायुती सरकारचा शपथविधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
Published On - Nov 27,2024 8:10 AM