त्या जायंट किलर ठरलेल्या आमदाराला मुंबईत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी थेट हेलिकॉप्टर पाठवलं? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झाला आहे. जयंट किलर ठरलेल्या आमदाराला मुंबईत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी थेट हेलिकॉप्टर पाठवल्याची चर्चा आहे. आमदार मुंबईकडे रवाना झाला आहे.

त्या जायंट किलर ठरलेल्या आमदाराला मुंबईत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी थेट हेलिकॉप्टर पाठवलं? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 10:56 PM

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरत महायुतीने राज्यात जोरदार मुसंडी मारली.  दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही राज्यातील पहिलीच निवडणूक होती, त्यामुळे मतदार कोणाच्या बाजुनं कौल देणार? खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोण? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

अखरे  सर्व 288 जागांचे निकाल हाती आले आहेत. महाविकास आघाडीला राज्यात केवळ 46 जागांवर समाधान मानावं लागलं.  तर दुसरीकडे महायुतीनं तब्बल 232 जागांवर विजय मिळवला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीमध्ये 132 जागांवर विजय मिळून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानं 41 जागांवर बाजी मारली आहे.

या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी प्रस्तापीत उमेदवारांना धक्का दिला आहे. त्यामुळे हे उमेदवार चर्चेत आले आहेत. जुन्नरमध्ये अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांचा पराभव केला आहे. अतुल बेनके यांचा पराभव करून शरद सोनवणे हे जायंट किलर ठरले आहेत. विजयानंतर शरद सोनवणे हे हेलिकॉप्टरनं जुन्नरमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले शरद सोनवणे हेलिकॉप्टरने थेट मुंबईला रवाना झालेत. सर्वांना धक्का देत सोनवणे यांनी अनपेक्षित विजय मिळवला आहे. त्यांनतर खुद्द एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवून, त्यांना मुंबईला बोलावल्याची चर्चा आहे. शरद सोनवणे  यांनी अतुल बेनके यांना पराभवाचा धक्का दिला आहे, शरद सोनवणे यांच्या या विजयाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....