संघावर बंदी घालण्याची काहींची मागणी हस्यास्पदच नव्हे तर मूर्खपणाची; मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका
नुकतीच राज्यासह संपूर्ण देशात पीएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. देशविरोधी कारवाया आणि कट कारस्थान करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी पीएफआयच्या (PFI) कारवाई वरुन विरोधकांवर जहरी टीका केली केलीय. बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा हल्लाबोल केला आहे. पीएफआयला पकडलं. त्यांच्यावर बंदी घातली. तेव्हा एकही शब्दाने तुम्ही बोलला नाही. केंद्र सरकार आणि अमित शहांनी (Amit shah) घेतलेला निर्णय योग्य आहे. राज्यातही पीएफआयला ठेचलं जाईल. या राज्याविरोधात कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. कुणी घातली बंदी नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून बोलत नाही का ? या देशात कोणत्याही स्लीपरसेलला थारा देणार नाही. पीएफआयला बंदी घातल्यानंतर संघावर बंदीची मागणी केली. अजब मागणी आहे. हे कुणाचे राष्ट्रवादी विचार आहे हे सांगायची गरज नाही. या देशात संघाचं मोठं योगदान आहे. देशात आपत्ती येते तेव्हा संघ पुढे असतो. राष्ट्र उभारणीत संघाचा हात कुणीच धरू शकत नाही. अन् तुम्ही संघ आणि पीएफआयची तुलना करताय. थोडी तरी वाटली पाहिजे. जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. ही हस्यास्पद आणि मूर्खपणाची मागणी आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे.
नुकतीच राज्यासह संपूर्ण देशात पीएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. देशविरोधी कारवाया आणि कट कारस्थान करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध असल्याचा संशय आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएफआयवर केलेल्या कारवाईचे स्वागत करत अमित शहा यांच्यासह केंद्राचे स्वागत केले होते.
याशिवाय राज्यात पाकिस्थानच्या संदर्भात केलेल्या घोषणाबाजीच्याबाबत कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील दिले होते.
याच वेळी विरोधकांनी या कारवाईचे स्वागत केले नाही म्हणून एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात विरोधकांवर हल्लाबोल करत टीका केली आहे.