Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाने दिला महत्त्वाचा निर्णय

यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाने दिला महत्त्वाचा निर्णय
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 10:49 AM

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’ चिन्हाचं ‘तुतारी’ हे मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचं नाव मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे कायम ठेवले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतंच एक पत्रक जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 26 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यासाठीच्या राज्यस्तरीय पक्षांच्या यादीमध्ये “नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार” या पक्षाचा समावेश केला आहे. या पक्षाला “Man Blowing Turha” हे चिन्ह देण्यात आले होते. या चिन्हाचे मराठी भाषांतर निवडणूक चिन्हांच्या तक्त्यामध्ये “तुतारी वाजविणारा माणूस” असे करण्यात आले होते. या दोन्हीही चिन्हांमध्ये सार्धम्य असल्याने प्रचारा दरम्यान मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होऊ शकतो. त्यामुळे तुतारी हे मुक्त चिन्ह असलेल्या चिन्हाचे मराठी भाषांतर “Trumpet” असे केले जावे, अशी विनंती राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली होती. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे ही विनंती करण्यात आली होती.

Trumpet या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरण तुतारी ऐवजी ट्रम्पेटच केले जाणार

आता केंद्रीय निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे यापुढे मुक्त चिन्हांच्या यादीमधील Trumpet या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरण तुतारी ऐवजी ट्रम्पेट असे करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सुधारित निवडणूक चिन्हांचा तक्त्ता PDF मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संदर्भातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करतेवळी व अन्य आवश्यक प्रयोजनासाठी सुधारित तक्त्यामध्ये नमूद केल्यानुसार “Trumpet” या मुक्त चिन्हाचे मराठी नाव “तुतारी ऐवजी “ट्रम्पेट” असे दर्शविण्यात यावे, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

त्यासोबतच निवडणूक चिन्हांच्या तक्त्यातील काही निवडणूक चिन्हांना इंग्रजी नावाप्रमाणे मराठी नाव दर्शविण्यात आले आहे. उदा. एअर कंडिशनर, ऑटो रिक्शा, बॅट, बॅटरी टॉर्च, ब्रेड टोस्टर, ब्रश, ब्रीफकेस, केक, कॅलक्युलेटर, कॅमेरा, लॅपटॉप, हेडफोन, हेलमेट, टेबल इत्यादी नावांबद्दल निवडणूक आयोगाने असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या पक्षाला मोठा दिलासा

दरम्यान मुक्त चिन्हांच्या नव्या सुधारित यादीत ट्रम्पेट या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतर तुतारी न करता ट्रम्पेट असेच ठेवण्यात येणार आहे. हा बदल विधानसभा निवडणुकीपूर्वी केला जाणार आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता नव्या सुधारीत तक्त्यामध्ये ट्रम्पेट या मुक्त चिन्हाचे मराठी नाव तुतारी ऐवजी ट्रम्पेट असे करण्यात येणार आहे.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.