औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार मनपा निवडणुका लांबणीवर, आयोगाचे नगरविकास खात्याला पत्र

औरंगाबाद महापालिकेची मुदत आज (28 एप्रिल) रोजी संपणार आहे, तर नवी मुंबई महापालिकेची मुदतही 7 मे 2020 पर्यंत आहे. (Election Commission letter about Administrator on Municipal Corporations)

औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार मनपा निवडणुका लांबणीवर, आयोगाचे नगरविकास खात्याला पत्र
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 3:26 PM

मुंबई : औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने नगरविकास खात्याला पत्र लिहून यासंदर्भात विचारणा केली आहे. निवडणुका शक्य नसल्याने प्रशासक नेमण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. (Election Commission letter about Administrator on Municipal Corporations)

‘कोरोना व्हायरस’च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. नजीकच्या काळातही निवडणुका घेता येत नसल्याने मुदत संपताच प्रशासक नेमावा लागणार आहे.

औरंगाबाद महापालिकेची मुदत आज (28 एप्रिल) रोजी संपणार आहे, तर नवी मुंबई महापालिकेची मुदतही 7 मे 2020 पर्यंत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याआधी निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली होती. मात्र हे संकट दूर होईपर्यंत अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत

हेही वाचा : ‘संभव हो तो जाने से पहले एक बार जरुर मिलना’, भाजप नेत्याचा मेसेज डावलून तनवाणी शिवसेनेत!

औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिका यांच्यासह कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ, राजगुरुनगर, भडगाव, वरणगाव, भोकर, मोवाड आणि वाडी या आठ नगरपालिका, केज नगर पंचायतीची मुदत नजीकच्या काळात संपत आहे.

अशी आहे मुदत 

औरंगाबाद महापालिका- 28 एप्रिल 2020 नवी मुंबई महापालिका- 7 मे 2020 वसई-विरार महापालिका – 28 जून 2020 कुळगाव-बदलापूर नगर परिषद- 19 मे 2020 अंबरनाथ नगर परिषद- 19 मे 2020 राजगुरूनगर (पुणे) नगर परिषद- 15 मे 2020 भडगाव (जळगाव) नगर परिषद- 29 एप्रिल 2020 वरणगाव (जळगाव) नगर परिषद- 5 जून 2020 भोकर (नांदेड) नगर परिषद- 9 मे 2020 मोवाड (नागपूर) नगर परिषद- 19 मे 2020 वाडी (नागपूर) नगर परिषद- 19 मे 2020 केज (बीड) नगर पंचायत- 1 मे 2020

(Election Commission letter about Administrator on Municipal Corporations)

'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.