सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता, सुनावणीत काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडली. यावेळी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला.

सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता, सुनावणीत काय घडलं?
सुप्रिया सुळे, शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 6:23 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीसही वापरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचं आता तेच चिन्हं असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. निवडणूक आयोगाने तशी अधिकृत मान्यताच आज पक्षाला दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगासमोर आज याबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा आहे.

सुनावणीनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रकारे काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हता. तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे”, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

“दुसरी एक मागणी चिन्हातील कन्फ्युजनबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरं तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही विनंती केली आहे. आयोग म्हणालं त्यावर आम्ही अभ्यास करू”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.