तुतारीसारखं दिसणारं चिन्ह नको…शरद पवार गटाच्या मागणीवर निवडणूक आयोगाचं उत्तर काय?

आम्ही सोशल मिडीयातील निवडणूक प्रचारात एआयचा गैरवापर करणाऱ्यांवर योग्य कारवाई करणार आहोत असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच काही लोक खोटे नॅरेटिव्ह तयार करीत आहेत. त्यावर आम्ही काही केलेले नाही. लोकच ते पाहून खोटं आहे की खरं ते ठरवतील असं आम्ही समजतो, पण त्यांनी मर्यादा ओलांडल्यास आम्ही कारवाई करू असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

तुतारीसारखं दिसणारं चिन्ह नको...शरद पवार गटाच्या मागणीवर निवडणूक आयोगाचं उत्तर काय?
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 5:19 PM

राज्यातील विधान सभा निवडणूकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. राज्यातील दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होणार असल्याने याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  तुतारी आणि पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे पिपाणी चिन्ह गोठवण्याची शरद पवार गटाची मागणी होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या या मागणीवर देखील निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण केलेले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा कार्यक्रम निव़डणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिलेली आहे. यावेळी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुक कायक्रम जाहीर करण्याच्या आधी निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांचा दौरा केला होता.त्यावेळी विविध राजकीय पक्षांशी चर्चा देखील केली होती. यावेळी काही राजकीय पक्षांनी त्यांच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. यावर निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण केले आहे.

निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला पक्ष फूटीनंतर निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलेले आहे. या निवडणूक चिन्हाबाबत दोन शरद पवार गटाने दोन विनंती केल्या होत्या. त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली आहे. पहिली विनंती होती की त्याचं चिन्हं योग्य नाही. ते मतपत्रिकेवर छोटं दिसतं.तसचे दुसरी विनंती केली होती की तुतारी सारखं दिसणारं दुसरे चिन्हं हटविण्यात यावे. यावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की आम्ही त्यांची पहिली विनंती मान्य केली आहे.त्याची योग्य दखल घेतली आहे. ते पुढे म्हणाले की त्यांना तुतारी चिन्ह कसं दिसलं पाहिजे हे आम्ही त्यांना विचारलं. त्यांनी आम्हाला सांगितलेला आकार आम्ही  मान्य केला आहे .दुसरं चिन्ह Trumpet हे सेम नाही. असं आम्ही त्यांना सांगितले आहे असेही आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तुतारी आणि पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी सारख्या दिसणाऱ्या पिपाणी चिन्हाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.