अटल सेतू मार्गे मंत्रालय ते स्वारगेट ( Mumbai to Pune ) एसटीची इलेक्ट्रीक शिवनेरी सुसाट धावणार, पाहा आठवड्यातून किती फेऱ्या धावणार

शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतूमुळे एसटी महामंडळाच्या शिवनेरीच्या प्रवास वेगवान होत आहे. या मार्गामुळे आता जलद गतीने मुंबई ते पुणे प्रवास घडत आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक शिवनेरीचे स्वागत मंत्रालय आणि कोर्ट कर्मचारी आणि प्रवाशांनी केले आहे.

अटल सेतू मार्गे मंत्रालय ते स्वारगेट ( Mumbai to Pune ) एसटीची इलेक्ट्रीक शिवनेरी सुसाट धावणार, पाहा आठवड्यातून किती फेऱ्या धावणार
msrtc SHIVNERI
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 5:05 PM

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी ) इलेक्ट्रीक शिवनेरीचा आता शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलावरून प्रवास सुरू झाला आहे. या शॉर्टकट मार्गामुळे एसटीचा फायदा होईल असे म्हटले जात आहे. इंजिनीअरिंगचा चमत्कार मानला जाणारा शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ( अटल सागरी सेतू ) आता एसटी महामंडळासाठी फायदेशीर ठरत आहे. हा मार्ग मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेला जोडला असल्याने मुंबई ते पुणे धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या गाड्यांना मुंबईतून बाहेर पडण्यासाठी जलद मार्ग उपलब्ध झाला आहे.

एसटीच्या शिवनेरीचा मुंबई – पुणे प्रवास अटल सेतूमार्गेने होत असल्याने एसटीला चांगला फायदा होत आहे. त्यामुळे एसटीतून मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांचा फायदा होत आहे. कारण वेळेत बचत होत आहे. या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून एसटी महामंडळ फेऱ्यांमध्ये हळूहळू वाढ करीत आहे. एसटी महामंडळाने स्वारगेट मंत्रालय – स्वारगेट अशी इलेक्ट्रीक शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस धावणार आहे.

महामंडळाची एक्सवरील पोस्ट येथे पाहा –

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूने प्रवासाचे अंतर कमी होत आहे. त्यामुळे शिवनेरीच्या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अटल  सागरी सेतूमुळे मुंबई-पुणे प्रवास 40  मिनिटांनी कमी होत असल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट शिवनेरी बस सेवेची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे, असे एसटी महामंडळाच्या अधिकऱ्याने सांगितले.

  • सोमवारी सकाळी 6 वाजता स्वारगेट – मंत्रालय
  • शुक्रवारी सायंकाळी 6.30 वा. मंत्रालय-स्वारगेट
  •  महिलांना आणि 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरात 50 टक्के सवलत तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत
  • पूर्ण तिकीट – 565 रुपये, अर्धे तिकीट – 295 रुपये
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.