VIDEO: धक्कादायक, वीज ग्राहकाचा संयम सुटला, नांदेडमध्ये कनेक्शन तोडल्यानं शिव्यांची लाखोली वाहत मारण्याची धमकी
विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार नांदेडच्या सिडको भागात घडलाय.
नांदेड : विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार नांदेडच्या सिडको भागात घडलाय. विजबिलाच्या वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित केल्याने एक ग्राहक भलताच संतापला. यावेळी त्याने वीज कर्मचाऱ्यांचा अक्षरशः उद्धार केलाय. शिव्यांची लाखोली वाहताना हा वीज ग्राहक स्वतः कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरीला असल्याचे सांगतोय. इतकेच नाही, तर वीज ग्राहक कर्मचाऱ्यांना मारण्याचाही प्रयत्न करत होता. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महावितरण आता संबंधित वीज ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करणार आहे (Electricity consumer use abusive words connection cutting by MSEB employee in Nanded).
व्हिडीओत वीज ग्राहकाची भूमिका काय?
या व्हिडीओत संबंधित ग्राहक स्वतः हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात कामाला असल्याचं सांगत आहे. तसेच वीज कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडल्याने संतापला आहे. तुम्ही अगोदर चला आणि माझी वीज जोडणी करुन द्या असा आग्रह संबंधित ग्राहक करत आहे. संतापलेल्या ग्राहकांने दोन मिनिटात वीज जोडणी करा अन्यथा येथून मार खाऊन जावं लागेल, असा इशारा दिला.
‘मागील महिन्यात 8 हजार रुपये वीज बिल भरलंय, माझा कनेक्शन जोडा’
संबंधित ग्राहक म्हणाला, “माझा पगार झाला असेल तर पगारच घे. माझा पगार झालाय का? मागील महिन्यात 8 हजार रुपये वीज बिल भरलंय. त्या इंजिनियरला बोलवा. खासगी कंपन्यांना वीज रिडिंग देण्याचं काम दिलंय. त्या सिडकोला इंडस्ट्रीत किती तरी लोक लाईट चोरी करतात. त्या खोट्या लोकांना काही करत नाही आणि वीज बिल भरणाऱ्या खऱ्या लोकांचं कनेक्शन तुम्ही तोडत आहात. तुम्ही माझ्यासोबत चला, मी 10 हजाराची गाडी करतो आणि तुम्हाला दाखवतो सिडकोत कशी वीज चोरी सुरु आहे. त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाहीत. माझी वीज जोडणी करुन द्या नाहीतर मार खाल्याशिवाय तुम्ही इथून जात नाही.”
वीज कर्मचाऱ्यांची भूमिका काय?
वीज कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं. तसेच तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या असं म्हटलं. वीज कर्मचारी आपल्या वरिष्ठांना फोन करुन ग्राहक मारहाण करण्याचा प्रयत्न करत असल्याची आणि शिवीगाळ करत असल्याची तक्रार करतात. तसेच तुमचा प्रश्न मिटल्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही, इथंच थांबून राहू असंही म्हणतात.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच सरकारची प्राथमिकता : उद्धव ठाकरे
हे आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करणार, नाना पटोलेंचं सूचक विधान
मुंबईकरांच्या खिशाला कात्री? वीज बिलामध्ये 50 रुपयांच्या वाढीचा शॉक?
संबंधित व्हिडीओ पाहा :
Electricity consumer use abusive words connection cutting by MSEB employee in Nanded