आयुक्तांच्या अंगावर गटारीचं पाणी फेकलं,मनपाच्या कर्मचाऱ्यांनी केले लेखणीबंद आंदोलन
मालेगावमध्ये आयुक्तांच्या अंगावर गटारीचे फेकलेले पाणी या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे, आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी देखील याबाबत वारिष्ठांकडे चौकशीची मागणी केली आहे.
मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या (MMC) हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था झाल्यानेआमदार मौलाना मुफ्ती इस्माईल ( MIM MLA) यांनी रास्ता रोको करत आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दरम्यान स्थानिक नागरिकांनी आलेल्या मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांची गाडी रोखत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि आंदोलकांनी आयुक्तांच्या अंगावर गटारीचे पाणी देखील फेकलं याच दरम्यान आयुक्तांच्या अंगावर जवळच असलेल्या चहाच्या टपरीवरून चहा देखील आणून तोफेकण्यात आला या होता. या सगळ्या परिस्थितीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हे सर्व वातावरण शांत करण्यामध्ये पोलिसांना यश आलं, मात्र याच काळामध्ये अनेक रस्त्यांचा मुद्दा घेऊन आंदोलकांनी आयुक्तांना प्रश्नांचा भडीमार केला होता.
या सर्व मुद्द्यावरून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळेला आयुक्तांवर दूषित पाणी फेकल्याच्या कारणावरून लेखणी बंद आणि हाताला काळा फिती लावून निषेध व्यक्त केला आहे.
गांधीगिरी पद्धतीने केलेले हे आंदोलन मनपा आयुक्तांच्या अंगावर फेकलेल्या आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीची मागणी केलीआहे.
एकूणच मालेगाव महानगरपालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या या यावेळी सोबत असून चौकशीकरून कारवाईची मागणी केली आहे.
मालेगावमध्ये आयुक्तांच्या अंगावर गटारीचे फेकलेले पाणी या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे, आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी देखील याबाबत वारिष्ठांकडे चौकशीची मागणी केली आहे.
याबाबत आमदार मौलाना मुफ्ती यांच्यासह आंदोलकांची चौकशी केली जाईल का ? आयुक्तांच्या अंगावर फेकलेल्या दूषित पाणी आणि चहाबाबत कारवाई कधी होणार का ? असे सवाल उपस्थित केले जात आहे.