ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं सामाजिक भान, कोरोनामुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं सामाजिक भान पुन्हा दिसून आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राऊत यांनी आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभ स्थगित केला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं सामाजिक भान, कोरोनामुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित
नितीन राऊत
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 4:37 PM

नागपूर : विदर्भातील नागपूरसह अन्य जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. विवाह समारंभाला 50 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं सामाजिक भान पुन्हा दिसून आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राऊत यांनी आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभ स्थगित केला आहे. तसं पत्रक ऊर्जामंत्र्यांनी काढलं आहे.(Nitin Raut postpones family event due to rising corona outbreak)

नितीन राऊतांचं नागरिकांना आवाहन

“प्रिय बंधू आणि भगिनींनो, नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः कोरोनाविरुद्धच्या लढाईवर बारकाईने नजर ठेवून आहे आणि वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचनाही देत आहे. आपणही कोरोनाच्या त्री-सूत्रीचे जसे मास्क लावणे, सॅनिटायझरने हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी बाबींचे पालन करावे, ही आग्रहाची विनंती.

दरम्यान, आमचे चिरंजीव आयुष्यमान कुणाल आणि आयुष्यमती आकांक्षाचा विवाह १९ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला आणि विवाह स्वागत समारंभ उद्या २१ फेब्रुवारीला नागपूर येथे आयोजित केला होता. मात्र, नागपुरातील कोरोनाची वाढती स्थिती पाहता हा सोहळा तूर्त स्थगित करून कोरोना प्रसार रोखण्यासाठी हातभार लावण्याचा निर्णय आम्ही राऊत कुटुंबीयांनी घेतला आहे.

आपणांस ह्या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. तरी हे निमंत्रण रद्द समजण्यात यावे आणि कोरोनाविरुध्दच्या या लढाईत आपण कृपया आम्हाला सहकार्य करावे ही नम्र प्रार्थना. आपणांस होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही व्यक्तिशः दिलगीर आहोत.” असं पत्रक राऊत यांनी काढलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहनही केलं आहे.

19 फेब्रुवारीला राऊतांच्या मुलाचा विवाह संपन्न

दरम्यान, नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपण सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुनच मुलाचे लग्न करणार असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं होतं. त्यानुसार 19 फेब्रुवारीला त्यांच्या मुलाचा विवाह पार पडला. पण या विवाहनिमित्त एक स्वागत समारोहाचं आयोजन 21 फेब्रुवारीला करण्यात आलं होतं. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा स्थगित करुन राऊत यांनी सामाजिक भान राखलं आहे.

संबंधित बातम्या :

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी, ठाकरे सरकारचा निर्णय

Nitin Raut postpones family event due to rising corona outbreak

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.