माजी मंत्री राम शिंदेंना मिळाला कलेक्टर जावई, ‘व्हॅलेंटाईन डे’ला सुपारी फुटली
राम शिंदे यांची मुलगी डॉ. अक्षता शिंदे आणि आएएस श्रीकांत खांडेकर (shrikant khandekar) यांचा साखऱपुडा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झाला.
अहमदनगर : माजी मंत्री राम शिंदे यांना कलेक्टर जावई मिळाला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या आपल्या मुलीसाठी चांगल्या मुलाच्या शोधात असताना या रेशीमगाठी जुळून आल्या. विशेष म्हणजे राम शिंदे यांची मुलगी डॉ. अक्षता शिंदे आणि आएएस श्रीकांत खांडेकर (shrikant khandekar) यांचा साखऱपुडा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झाला. हे नातं जुळून आल्यामुळे सध्या शिंदे आणि खांडेकर हे दोन्ही कुटुंबं आनंदी आहेत. साखरपुड्याचा कार्यक्रम चौंडी येथे पार पडला. (engagement of former minister Ram Shinde daughter Akshata Shinde with IAS shrikant khandekar)
सत्कार करायला गेले अन् मुलगा मनात बसला
श्रीकांत खांडेकर यांनी बी.टेकचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. शासकीय सेवेत रुजू होण्याची जिद्द मनात असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यामातून ते आएएस झाले. त्यानंतर या घवघवीत यशाबद्दल सत्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरु केली. श्रीकांत याचा सत्कार माजी मत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरले. यावेळी राम शिंदे यांना आपली मुलगी डॉ. अक्षतासाठी योग्य वर म्हणून श्रीकांत खांडेकर मनात भरले. त्यानंतर हे नातं जुळून आलं.
गरिबीतून पुढे आलेले श्रीकांत खांडेकर
राम शिंदे हे जरी एक माजी मंत्री असले तरी त्यांचा होणारा जावई हा साधारण कुटुंबातील आहे. श्रीकांत यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण केले. त्यांनी दिवसरात्र एक करुन युपीएससीची परीक्षा पास केली. सध्या ते प्रशिक्षण घेत आहेत. तर राम शिंदे यांची मुलगी डॉ. अक्षता शिंदे यासुद्धा एक डॉक्टर आहेत. शिंदे यांची दुसरी मुलगी अन्विता शिंदे ही एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला आहे.
दरम्यान, या नव्या नात्यामुळे खांडेकर आणि शिंदे कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ही रेशीमगाठ जुळून आल्यानंतर लवकरच या दोघांचेही लग्न होणार आहे. श्रीकांत यांचा मोठा भाऊ हा विवाहित असून ते मार्केटिंग मॅनेजर आहेत.
…तर विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं म्हणत रोहित पवारांचा भाजपला टोला, आजोबांच्या सल्ल्याचाही दिला दाखलाhttps://t.co/LaPBYhzZa7
@RRPSpeaks | @RamShindeMLA | #BJP | #NCP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021
इतर बातम्या :
राऊतांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे,पवार आणि फडणवीस भेटीचा पुन्हा एकदा योग!
संजय राऊतांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; 31 जानेवारीला मुलीचा साखरपुडा
दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा सवाल
(engagement of former minister Ram Shinde daughter Akshata Shinde with IAS shrikant khandekar)