औरंगाबादमध्ये प्रत्येक दुकानदाराची कोरोना टेस्ट होणार, टेस्ट न केल्यास दुकान उघडण्यास बंदी
औरंगाबादमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Shopkeeper Corona test Aurangabad) आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Shopkeeper Corona test Aurangabad) आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 82 कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता औरंगाबादमधील प्रत्येक व्यापारी आणि दुकानदारांची कोरोना टेस्ट केली जाणार आहेत. कोरोना टेस्ट केल्याशिवाय दुकान उघडण्यास बंदी घालण्यात आली (Shopkeeper Corona test Aurangabad) आहे.
कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र दुकानदारांनासोबत बाळगण्याचे बंधन घालण्यात आले आहे. आज (18 जुलै) दुपारपासूनच व्यापारी आणि दुकानदारांच्या मेगा कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत. कोरोना टेस्ट नसलेल्या दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे. कोरोना टेस्ट निगेटिव्हचे प्रमाणपत्र असलेल्या दुकानदारांकडूनच खरेदी करा, असं आवाहनही प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
औरंगाबाद जिल्ह्यात काल (17 जुलै) एका दिवसात 338 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यासोबत काल एका दिवसात 225 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 82 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 385 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 5861 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 38336 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
संबंधित बातम्या :
Pune Lockdown | पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई