Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big News | ब्रेस्ट कँसरचं भीषण चित्र, दर 6 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू, महाराष्ट्र सरकारचं मोठं पाऊल, दर बुधवारी….

या आजारावर घरच्या घरी निदान करण्यासाठी टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण, शहरी भागात आशा वर्कर, महिला बचत गट, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून याबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.

Big News | ब्रेस्ट कँसरचं भीषण चित्र, दर 6 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू, महाराष्ट्र सरकारचं मोठं पाऊल, दर बुधवारी....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 1:22 PM

मुंबई : आज देशात 90 हजार महिला स्तन कर्करोग (Breast cancer) आजारामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. दर सहा मिनिटाला एका महिलेचा मृत्यू या आजारामुळे होत आहे. पूर्वी हा आजार 50 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांमध्ये आढळून येते होता. आज हा आजार 25 ते 40 वयोगटातील तरुण महिलामध्ये आढळत आहे, त्यामुळे या आजाराविरोधात लढण्यासाठी सर्वच स्तरांतील महिलांमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. राज्य शासानाच्या वतीने असे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे दर बधुवारी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दर बुधवारी स्तनाच्या कर्करोगाच्या निदान व उपचारासाठी समर्पित ओपीडी सुरू करण्यात करण्यात येणार आहे. ही ओपीडी दुपारी 12 ते 2 दरम्यान सुरू राहणार असून यावर उपचारासाठी कुठलेही पैसे लागणार नाहीत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मुंबईत भव्य रॅलीचं आयोजन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग जनजागृती व उपचार भव्य रॅलीचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज काळा घोडा येथे झेंडा दाखवून करण्यात आले. ही रॅली काळा घोडा, लायन गेट, ओल्ड कस्टम ऑफिस, एशियाटिक लायब्ररी,जनरल पोस्ट ऑफिस ते सेंट जॉर्ज रुग्णालय इथपर्यंत काढण्यात आली. या रॅलीत २ हजारपेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये के. जी. मित्तल आयुर्वेद महाविद्यालय यांच्याशी संलग्न 18 महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक या रॅलीत सहभागी झाले होते. आजची बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव पाहता महिलांमध्ये स्तन कर्करोग आजार वाढत असतांना दिसत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी स्तन कर्करोग जनजागृती व त्यावर उपचार ही काळाची गरज आहे, असे उद्गार वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी काढले.

आयुर्वेदिक महाविद्यालयांंकडून जागृती

वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक महिला दिनी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला संबोधित करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते. जागतिक महिला दिनानिमित शुभेच्छा देवून ते पुढे म्हणाले की, आयुर्वेदिक महाविद्यालयाची याबाबत खूप मोठी जबाबदारी आहे. हा आजार चार स्टेपमध्ये आहे. या आजाराचे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेपमध्ये निदान झाले तर उपचार होऊ शकतात. 3 ऱ्या व 4 स्तरावर यावर उपचार करने कठीणअसते.

घरी उपचारासाठी प्रशिक्षण

या आजारावर घरच्या घरी निदान करण्यासाठी टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण, शहरी भागात आशा वर्कर, महिला बचत गट, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून याबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी शासनामार्फत प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दर बुधवारी स्तनाच्या कर्करोगाच्या निदान व उपचारासाठी समर्पित ओपीडी सुरू करण्यात करण्यात येणार आहे. ही ओपीडी दुपारी 12 ते 2 दरम्यान सुरू राहणार असून यावर उपचारासाठी कुठलेही पैसे लागणार नाहीत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आजारावर मात करण्यासाठी व्यसनापासून दूर रहा व नियमितपणे व्यायाम, योगासन करा, असे आवाहनही मंत्री महाजन यांनी केले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.