तृप्ती देसाईंकडून त्या पोलिसांविरोधात पुरावे सादर; पेन ड्राईव्हमध्ये नेमकं काय?
बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराड याच्या जवळ असलेल्या पोलिसांचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यांनी आज ते पुरावे पोलिसांना दिले आहेत.

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराड याच्या जवळ असलेल्या पोलिसांचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यांनी आज ते पुरावे पोलिसांना दिले आहेत. तृप्ती देसाई यांनी आज बीडमध्ये जाऊन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीय 26 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधात पुरावे दिले आहेत. त्यांनी यावेळी एक पेन ड्राईव्ह दिला आहे.
नेमकं काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
अपर पोलीस अधीक्षकांनी मला नोटीस पाठवली होती. आपण सगळ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पुरावे द्यावेत. आज आम्ही त्यांना सगळे पुरावे दिले आहेत, तातडीने या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्याबाहेर बदली होणं गरजेचं आहे. त्यांना निलंबित करायला पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की जेव्हा मी लिस्ट पाठवली तेव्हाच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. मात्र आम्ही आता पुरावे दिले आहेत, त्यामुळे आता जवाब नोंदवणं गरजेचं होतं.
पुरावे दिलेत काही गोपनीय माहिती त्याना दिली, काही पेन ड्राईव्हमध्ये व्हिडिओ दिले आहेत. अपर पोलीस अधीक्षकांनी मला सांगितलं याबाबत लवकरात लवकर कारवाई होईल. जे खरोखरच अनेक वर्ष कार्यरत आहेत, ज्यांनी चुकीची काम केली आहेत, त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवू, मला हसायला येतं मी पुरावे देण्याच्या आधीच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचे जवाब नोंदवण्यात आले. कुठलाही कर्मचारी सांगणार नाही की, मी चूक केली म्हणून, ते नाहीच म्हणार आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांचे जवाब काही असूद्यात, पण आता पुरावे आहेत, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी. माझी अपेक्षा अशी आहे की, आम्ही दिलेल्या पुराव्याची गोपनीय चौकशी ताबडतोब करावी, हे अधिवेशन संपायच्या आधी गृहमंत्र्यांनी या सगळ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवावं, निलंबित करावं, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी आज मस्साजोगला देखील भेट दिली.