माजी आमदाराचा विद्यमान आमदाराला धक्का, जतमध्ये भाजप-राष्ट्रवादी प्रणित पॅनेलला 13 पैकी 13 जागा

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत याचा पराभव झाला होता. त्यामध्ये विलासराव जगताप याचे प्रकाश जमदाडे हे निवडून आले होते, आणि आता जत विकास सोसायटीच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व 13 जागा जिकून जगताप यांनी आमदार विक्रम सावंत याना पुन्हा एकदा दे धक्का करत सडकून पराभव केला आहे.

माजी आमदाराचा विद्यमान आमदाराला धक्का, जतमध्ये भाजप-राष्ट्रवादी प्रणित पॅनेलला 13 पैकी 13 जागा
विजयानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 7:16 AM

सांगली – जतमध्ये (jath) सर्व सेवा विकास सोसायटीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार विलासराव जगताप (vilasrao jagtap) यांचा भाजप-राष्ट्रवादीचा (bjp-ncp) शेतकरी विकास पॅनेल, तर विद्यमान आमदार विक्रम सावंत (vikram sawant) यांचा काँग्रेस प्रणित शेतकरी सहकारी विकास पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाल्याचे सांगलीकरांना पाहायला मिळाले. त्यामुळे या निवडणूक निकालाकडे जत तालुक्यातील अनेकांचे लक्ष लागले होते. कारण होणाऱ्या सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत पेक्षा सर्व सेवा विकास सोसायटीच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. माजी आमदार विलासराव जगताप यांनी विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना पुन्हा धक्का दिला आहे. जत सर्व सेवा विकास सोसायटीच्या निवडणुकीत जगताप यांच्या भाजप-राष्ट्रवादी प्रणित शेतकरी पॅनेलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले, तर आमदार सावंत यांच्या काँग्रेस प्रणित पॅनेलचा सडकून पराभव झाला. त्यामुळे काल जत तालुक्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.

6 गावातील कार्यक्षेत्रात जल्लोष

जतमध्ये सर्व सेवा विकास सोसायटीच्या निवडणुकीमध्ये अमृतवाडी, अचकनहळळी, वाशान, तिप्पेहळ्ळी, मल्लाळ या 6 गावातील कार्यक्षेत्र होते. तिथल्या कार्यक्षेत्र एकूण 1436 मतदार आहेत. त्यापैकी 928 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागेल याकडे सगळ्यांचे लागेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण सर्व सेवा विकास सोसायटीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार विलासराव जगताप पॅनेलचा विजय झाल्यानंतर 6 गावातील कार्यक्षेत्रात जल्लोष केला. विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना पुन्हा धक्का दिल्याने ते नाराज असल्याचे समजते. तसेच विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत.

आमदार विक्रम सावंत यांना पराभव जिव्हारी

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत याचा पराभव झाला होता. त्यामध्ये विलासराव जगताप याचे प्रकाश जमदाडे हे निवडून आले होते, आणि आता जत विकास सोसायटीच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व 13 जागा जिकून जगताप यांनी आमदार विक्रम सावंत याना पुन्हा एकदा दे धक्का करत सडकून पराभव केला आहे. सांगलीच्या राजकारणात अनेकांना रस आहे, तसेच सांगलीने आत्तापर्यंत महाराष्ट्राला चांगले नेते दिले आहेत. त्यामुळे अनेकांचे सांगलीतील निवडणुकीवर बारकाईने लक्ष असते. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झाल्याने ते नाराज असल्याचे समजते. तर त्यांचा पराभव का झाला यावर विचारमंथन करावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.

युद्धामुळे हल्ली चर्चेत असलेला देश यूक्रेन, अन्य काही गोष्टींमुळे देखील ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

Nanded | कंधार आणि मुखेड नगर परिषदेची मुदत संपली, आता प्रशासक राज, निवडणूक प्रक्रियेकडे स्थानिक राजकारण्यांचे लक्ष

‘झिरो बजेट’ शेतीचा गाजावाजा, प्रत्यक्षात क्षेत्र वाढल्यावर काय होणार परिणाम? आयसीएआरचा धक्कादायक अहवाल

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.