फोडाफोडीला सुरुवात, भुजबळांच्या जिल्ह्यात शिवसेनेचा माजी आमदार राष्ट्रवादीत

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे माजी आमदार आणि सध्या जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते धनराज महाले यांनी आपल्या समर्थकांसह मनमाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाले यांनी प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाले यांच्या […]

फोडाफोडीला सुरुवात, भुजबळांच्या जिल्ह्यात शिवसेनेचा माजी आमदार राष्ट्रवादीत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे माजी आमदार आणि सध्या जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते धनराज महाले यांनी आपल्या समर्थकांसह मनमाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाले यांनी प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला महत्त्व प्राप्त झालं आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

धनराज महाले हे माजी खासदार हरीभाऊ महाले यांचे पुत्र आहेत. 2009 साली ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. 2014 ला भाजपचे हरीश्चंद्र चव्हाण इथून निवडून आले होते. गेल्या तीन टर्मपासून ते इथे खासदार आहेत. वाचादिंडोरी लोकसभा : भुजबळ पिता-पुत्रांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी?

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य पिंजून काढण्यासाठी दौरा सुरु केला आहे. छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी आतापासूनच फोडाफोडी सुरु झाल्याचं दिसतंय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातच छगन भुजबळ यांचा विधानसभा मतदारसंघ येतो. ते येवल्याचे आमदार आहेत. तर त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळही याच लोकसभा मतदारसंघातील नांदगावचे आमदार आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या तीन टर्मपासून विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूरच आहे. 2014 ला भाजपचे हरीश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा जवळपास साडे तीन लाख मतांनी पराभव केला होता. पण यावेळी ही जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या माजी आमदारालाच आपल्या गोटात घेतलं आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.