Corona : मुंबईकरांना धडकी, कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे रुग्ण
एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई : मुंबईत आज आढळून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांनी पुन्हा धडकी भरवली आहे, कारण मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाली आहे, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तम नियोजन आणि कोरोनाला रोखणारा मुंबई पॅटर्न जगभर गाजला मात्रा आता त्याच मुंबईला पुन्हा धडकी भरली आहे, कारण मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.
एकाच दिवसात जवळपास दुप्पट रुग्णवाढ
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण कमी झाल्याने थोडी उसंत मिळाली होती, मात्र काही दिवसातच कोरोनाचा पुन्हा नवा व्हेरिएंट आला आणि पुन्हा एकदा चिंता वाढली. काल संपूर्ण राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा एकविशेच्या पुढे होता, मात्र आज एकट्या मुंबईचा आकडा पंचविशेच्या पुढे गेल्याने प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. काल मुंबईत तेराशेच्या पुढे कोरोना रुग्ण आढळून आले होते, मात्र आज जवळपास रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे ही स्फोटक वाढ सहाजिकच सर्वांची डोकेदुखी वाढवणारी आहे.
#CoronavirusUpdates 29th December, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) – 2510 Discharged Pts. (24 hrs) – 251
Total Recovered Pts. – 7,48,788
Overall Recovery Rate – 97%
Total Active Pts. – 8060
Doubling Rate – 682 Days Growth Rate (22 Dec – 28 Dec)- 0.10%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 29, 2021
मुंबईत नवी नियमावली नागू
या स्फोटक रुग्णवाढीनंतर मुंबई महापालिकाही अलर्ट मोडवर आली आहे, मुंबई महापालिकेडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यात हॉटेल व उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. महानगरपालिका आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी आणि 7 दिवसाचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. हवाईमार्गे आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या कोविडबाधित रुग्णांसाठी बीकेसी आणि नेस्को कोविड केंद्रात स्वतंत्र, निःशुल्क विलगीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मालाड आणि कांजूरमार्ग कोविड केंद्र तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.