हुश! कोणाचा हापूस अंबा निघाला लासलगाव मार्गे अमेरिकेला; कोरोनामुळे थांबलेली निर्यात पुन्हा सुरू
लासलगाव : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्या भारतातील हापूस आंब्याची (Hapus Mango) अमेरिकेतील नागरिकांना भारतीय आंब्याची भुरळ पडलेली आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणच्या हापूस आंब्यावर संक्रातीची वेळ आली होती. कोरोनामुळे देशातील आणि देशाबोहेरील सर्व व्यवहार बंद होते. ज्यामुळे आंब्याच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. तर निर्यात (Export) बंद झाल्याने व्यापारी ही संकटात […]
लासलगाव : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्या भारतातील हापूस आंब्याची (Hapus Mango) अमेरिकेतील नागरिकांना भारतीय आंब्याची भुरळ पडलेली आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणच्या हापूस आंब्यावर संक्रातीची वेळ आली होती. कोरोनामुळे देशातील आणि देशाबोहेरील सर्व व्यवहार बंद होते. ज्यामुळे आंब्याच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. तर निर्यात (Export) बंद झाल्याने व्यापारी ही संकटात सापडले होते. त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता मात्र कोकणच्या हापूस आंबा व्यवसायिकांसाठी आनंदाची आणि चांगली बातमी आली असून कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. कोरोनानंतर (Corona) निर्यातीवरील सर्व निर्बंध हटविण्यात आल्यानंतर आंब्याची मागणी वाढली आहे. दर्जेदार द्राक्षे आणि कांदा निर्यातीत पुढाकार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आता आंब्याच्या निर्यात केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे. कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत (USA) सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस, केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन पहिल्या कंटेनर मधून 3 टन आंबे 950 पेटीतून अमेरिकेला रवाना झाले.
हापूसवर बंदी
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. तसाच त्याचा परिणाम फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्यावर ही झाला होता. त्यामुळे फळबागायतदारांचे मोठे नुकसान झाले. त्याआधी 2013 साली युरोपियन महासंघाने भारतातून आयात होणार्या हापूस आंब्यावर फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण सांगत फाळांचा राजा असलेल्या हापूसवर बंदी घातली होती. त्यामुळे हापूसचे आता काय होणार? ही चिंता होती. पण आता ही चिंता कायम स्वरूपी मिटली आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत आहे. त्यामुळे भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या दिशेने कूच करू लागला आहेत. कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिके सुरु झालेली आहे.
12 एप्रिल ते 20 जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीच्या वतीने विकिरण प्रक्रिया केली जाणार आहे. लासलगाव येथे 31 ऑक्टोंबर 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.
निर्यात कोणत्या देशात होते?
लासलगाव येथून आंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून हा हापूस सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, हय़ूस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठविला जाणार आहे.
विकिरण प्रक्रिया म्हणजे?
लासलगावच्या केंदात गॅमा किरणांचा 400 ते 700 ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निमिर्तीची प्रक्रिया ही थांबते कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.
2007 पासून अमेरिकेला झालेली भारतीय आंब्याची आवक
- 2007 – 157 निर्यात (टन)
- 2008 – 275 निर्यात (टन)
- 2009 – 121 निर्यात (टन)
- 2010 – 96 निर्यात (टन)
- 2011 – 85 निर्यात (टन)
- 2012 – 210 निर्यात (टन)
- 2013 – 281 निर्यात (टन)
- 2014 – 275 निर्यात (टन)
- 2015 – 328 निर्यात (टन)
- 2016 – 560 निर्यात (टन)
- 2017 – 600 निर्यात (टन)
- 2018 – 580 निर्यात (टन)
- 2019 – 685 निर्यात (टन)
२०२० आणि 2021 कोरोना प्रादुर्भावामुळे आंबा परदेशात न गेल्याने विकिरण प्रकिया झाली नाही.
700 ते 800 मेट्रिक टनआंबाचे उद्दिष्ट
यंदाच्या हंगामातील पहिल्या 7.5 मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून हा आंबा व्यापार्यांकडून अमेरिकेला पाठविण्यात आला. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आंबा परदेशात लासलगाव येथे विकिरण प्रकियेसाठी आला नाही. या वर्षी मात्र 700 ते 800 मेट्रिक टनआंबाचे उदिष्ट ठेवण्यात आले असल्याचे भाभा अणु संशोधन केंद्र, लासलगाव विकिरण प्रक्रिया अधिकारी संजय आहेर यानी माहिती दिली.
यंदाच्या हंगामातील पहिल्या साडेसात मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून हा आंबा व्यापार्यांकडून अमेरिकेला पाठविण्यात आला. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आंबा परदेशात लासलगाव येथे विकिरण प्रकियेसाठी आला नाही. या वर्षी मात्र 700 ते 800 मेट्रिक टनआंबाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे भाभा अणु संशोधन केंद्र, लासलगाव विकिरण प्रक्रिया अधिकारी संजय आहेर यानी माहिती दिली.
इतर बातम्या :