VIDEO | तुम्ही दाऊदची माणसे वक्फ बोर्डात नेमली, फडणवीसांच्या पुराव्याने ठाकरे सरकार धास्तावले
महाविकास आघाडी सरकाने चक्क दाऊची माणसे वक्फ बोर्डात नियुक्त केल्याचा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला. वक्फ बोर्डातली ही माणसे नवाब मलिकांची खास आहेत. त्यामुळे पर्यायाने मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा रोख फडणवीसांच्या बोलण्यात होता. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील, पण बॉम्बस्फोटात असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणे कितपत योग्य आहे. या वक्फ बोर्डातील सदस्यांचा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंध आहे. तरीही हा माणूस वक्फ बोर्डात कसा? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
मुंबईः वक्फ बोर्डाच्या सदस्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा पेनड्राईव्ह बॉम्ब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी टाकल्याने विधानसभा पुन्हा एकदा हादरली. त्याही पुढे जात महाविकास आघाडी सरकाने डॉ. मुदस्सीर लांबेसारखी चक्क दाऊची माणसे वक्फ बोर्डात नियुक्त केल्याचा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला. वक्फ बोर्डातली ही माणसे नवाब मलिकांची खास आहेत. त्यामुळे पर्यायाने मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा रोख फडणवीसांच्या बोलण्यात होता. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील, पण बॉम्बस्फोटात असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणे कितपत योग्य आहे. या वक्फ बोर्डातील सदस्यांचा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंध आहे. तरीही हा माणूस वक्फ बोर्डात कसा? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. वक्फ बोर्डाच्या सदस्याच्या संवादाचा एक व्हिडिओच फडणवीसांनी पेनड्राईव्हमधून विधानसभा अध्यक्षांना दिला. या प्रकरणातील एक जण तुरुंगात आहे. त्याच्या मोबाइलमध्ये सर्व संभाषण आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घ्या आणि कारवाई करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
नेमके संभाषण काय?
फडणवसींना सादर केलेल्या पेनड्राईव्हमधील संवादातून वक्फ बोर्डाशी संबंधित व्यक्ती हा दाऊदशी संबंध असल्याची सरळ-सरळ कबुली देतोय. त्यातील डॉ. मुदस्सीर लांबे अर्शद खानला म्हणतो की, सलामवालेकूम…मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम…मेरे ससूर दाऊद कें राइट हँड थे पहले और मेरा रिश्ता जो हसिना आपा ने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दाऊद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है, अशी कबुलीच डॉ. लांबेंनी आपल्या संवादात दिली आहे.
पुढील संभाषण असे…
अर्शद खान : तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.
डॉ. लांबे : मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.
अर्शद खान : अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.
डॉ. लांबे : मेरे घर में कोई मसला होता है, तो वहाँ तक पहुचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुंचती है. अभी चार-पास दिन सें मेंरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.
अर्शद खान : इसलिए मैने पुछा सही-सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नही मेरा अपना टेन्शन है.
डॉ. लांबे : अर्शद मै तो बोलता हु की, तुम अभी तुम अभी वक्फ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो. पुरे वक्फ के काम शुरू करो. कमाने का सेंटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा.
अर्शद खान : अभी मै बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.
डॉ. लांबे : मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.
अर्शद खान : अर्शद के नाम सें बिल्डींग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नही मारेगा.
डॉ. लांबे : तुम्हारे उपर इनक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नही बैठ सकती.
इतर बातम्याः