Lockdown : शेतातील मंदिराच्या ओट्यावर लेकीचं लग्न लावलं, निफाडच्या शेतकऱ्याचं राज्यभर कौतुक

या लग्नात ना कुठला बँड बाजा, ना कुठलं गावजेवण. अगदी साध्या पद्धतीने निफाडच्या एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचं कन्यादान केलं.

Lockdown : शेतातील मंदिराच्या ओट्यावर लेकीचं लग्न लावलं, निफाडच्या शेतकऱ्याचं राज्यभर कौतुक
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 11:35 PM

लासलगाव : नाशिकच्या निफाड तालुक्यात लॉकडाऊनमध्ये (Farm Wedding In Lockdown) अगदी साधेपणाने एक विवाह सोहळा पार पडला. या लग्नात ना कुठला बँड बाजा, ना कुठलं गावजेवण. अगदी साध्या पद्धतीने निफाडच्या एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचं कन्यादान केलं. गावातील शेतात असलेल्या मदिराच्या ओट्यावर हे लग्न झालं. त्यामुळे लग्नासाठी गाजा-वाजा महत्त्वाचे (Farm Wedding In Lockdown) नसल्याचे दिसून आले.

लग्न म्हंटल, की प्रत्येक नवरदेव-नवरीला आपला विवाह थाटामाटात व्हावा, अशी इच्छा असते. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या या इच्छांमध्ये विर्जन पडलं. याच काळात निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने ज्या पद्धतीने आपल्या लेकीचे लग्न केले, ते चर्चेचा विषय ठरलं आहे.

कैलास शिंदे या शेतकऱ्याची मुलगी सायली आणि सिन्नर तालुक्यातील शेतकरी रावसाहेब पवार यांचे चिरंजीव निखिल पवार यांचे लग्न पार पडलं. कैलास शिंदे यांच्या शेतातील मंदिराच्या ओट्यावर कुठलाही थाटमाट न करता अगदी सध्या पद्धतीने हे लग्न पार पडलं. विशेष म्हणजे या लग्नात लॉकडाउनच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं. मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडत असतांना प्रत्येकाच्या तोंडाला (Farm Wedding In Lockdown) मास्क होता. हातात सानिटायझरची बाटलीही होती आणि सोशल डिस्टनसिंग पाळत हे लग्न उरकलं.

हे शेतातील लग्न अगदी महामार्गलगत असल्याने रस्त्याने जाणाऱ्या निफाडच्या तहसीलदारांनी गर्दी पाहून गाडी थांबविली. मंदिरात येऊन जेव्हा त्यांनी पाहिले, तेव्हा या शेतकऱ्याने काळ्या मातीतच लेकीचं लग्न उरकल्याचं तहसीलदारांच्या लक्षात आलं. तहसीलदारांनी शेतकऱ्याचं कौतुक करत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे ग्रामीण भागात हा पायंडा पडल्याने सर्वांनी यांचं अनुकरण करावं असं आवाहन तहसीलदारांनी केलं.

नाशिकच्या निफाडमध्ये सध्या या लग्नाची जोरदार चर्चा आहे. जिथे लॉकडाऊनमुळे अनेकांची लग्न लांबणीवर गेली आहेत. तिथे वर्षानुवर्षे काबाड कष्ट करणाऱ्या या शेतकऱ्याने आपल्या काळ्या मातीतच या संकट काळात लेकीचं लग्न लावल्याने सोशल मीडियावर देखील त्याचं कौतुक (Farm Wedding In Lockdown) केलं जात आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.