दिल्लीनंतर महाराष्ट्रातही शेतकरी संघटनांचा राज्यव्यापी एल्गार, 3 डिसेंबरला रस्त्यावर उतरणार

अहमदनगर : दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही मोदी सरकारच्या नव्या कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार केला आहे. किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वात उद्या (3 डिसेंबर) महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. “केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी आंदोलन करणार आहोत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या […]

दिल्लीनंतर महाराष्ट्रातही शेतकरी संघटनांचा राज्यव्यापी एल्गार, 3 डिसेंबरला रस्त्यावर उतरणार
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 12:25 AM

अहमदनगर : दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही मोदी सरकारच्या नव्या कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार केला आहे. किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वात उद्या (3 डिसेंबर) महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. “केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी आंदोलन करणार आहोत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला,” अशी माहिती किसान संघर्ष समितीने दिली (Farmer Protest in Maharashtra to Support Delhi protest against New Farm Laws).

किसान संघर्ष समितीने म्हटलं आहे, “केंद्रातील भाजप सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. गेले 4 दिवस लाखो शेतकरी केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन बसले आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्यात येणार आहे.”

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने सर्व सामाजिक संघटनांना या आंदोलनात सहभागी होण्याची हाक दिली आहे.

“संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांना बरोबर घेतलं जाईल. 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून आणि ठिकठिकाणी रस्ता रोको करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे,” असंही किसान संघर्ष समितीने सांगितलं.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

आपल्या अन्नदात्यांच्या या आंदोलनात राज्यातील जनतेने प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलं आहे. राज्यातील आंदोलन तीव्र करण्यासाठी झालेल्या बैठकीत शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ.अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले यांनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी संघटना व समाजसेवी संघटनांचे व्यासपीठ असलेल्या जनसंघटनांची समन्वय समितीची ऑनलाईन बैठक विश्वास उटगी यांच्या पुढाकारात झाली. या समितीनेही 3 डिसेंबरच्या राज्यातील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :

पोलिसांनी शेतकऱ्याला मारणं सोडा स्पर्शही न केल्याचा भाजप आयटी सेलचा दावा, ट्विटरकडून अमित मालवीय यांचं ट्विट ‘फ्लॅग’

BREAKING | शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत? राजू शेट्टी कडाडले

Farmer Protest | कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांचा, प्रियांका गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

Farmer Protest in Maharashtra to Support Delhi protest against New Farm Laws

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.