नाशिक : कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडीत केल्याने जिल्ह्यातील सय्यद पिंप्री येथे (Farmer) शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, याकडे ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनीधीचे. परंतू, वीजपुरवठा खंडीत केल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला होता. गेल्या पाच दिवसांपासून हीच अवस्था असल्याने याकडे (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान तर होत आहे. शिवाय पाण्याविना जनावरांचे हाल पाहवत नसल्याने आंदोलना दरम्यान एका शेतकऱ्याने चक्क महवितरणच्या टॉवरवरच गळफास घेऊन (Farmer suicides) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या दरम्यान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसांगअवधान दाखविल्याने दुर्घटना टळलेली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून सय्यद पिंप्री येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने बबन ढिकले याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
वीजपुरवठा खंडीत करताना किमान शेतकऱ्यांना पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. मात्र, कृषिपंपाकडील थकबाकीमुळे महावितरणने थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला होता. त्यामुळे पाणी असतानाही रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. सर्वकाही असतानाही महावितरणच्या मनमानी कारभारामुळे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या कृषिपंपाकडील वाढत्या थकबाकीमुळे महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. सबंध राज्यात अशाचप्रकारे कारवाई केली जात आहे. मात्र, कारवाई करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती पावले उचलता येतात. मात्र, या मंडळातील विद्युत पूरवठा खंडीत करताना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही शिवाय सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलन सुरु असून दुपारपर्यंत त्याची दखल घेतली नाही. म्हणून शेतकरी आक्रमक झाले. विहीरी भरलेलल्या असताना जनावरांसाठी देखील पाण्याचा उपयोग होत नाही तर काय उपयोग? त्यामुळे जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.
ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचे काम हे ठरलेलेच आहे. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यंदा मूलबक प्रमाणात पाणी असतानाही केवळ महावितरणने केलेल्या कारवाईमुळे पिकांचे नुकसान होत आहे. शिवाय वीजबिल अदा करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतच देण्यात आली नाही. थेट कारवाई केल्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळेच शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. खंडीत केलेला विद्युत पूरवठा पुन्हा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत होणे गरजेचे आहे. येथे मात्र, आस्मानी संकटानंतर लागलीच सुलतानी संकट उभे केले जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्यावतीने केला आहे.
महावितरणचा शॉक : शेतकऱ्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन, राज्यभरात कारवाई अन् आंदोलनाचे सत्र सुरुच
Latur : चोरटे ते चोरटेच, लातूरात जमले नाही तर चाकूरात आजमावयाला गेले मात्र, पोलिसांच्या..