Tapi River : तापी नदीवर दोन बॅरेजचा शेतकऱ्यांना फायदा, पण या कारणामुळे वेगळीचं चर्चा
गेल्या दोन महिन्यापासून वीजपुरवठा खंडित नसून, सारंगखेडा या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही आहे, सीसीटीव्ही बंद पडले आहेत. अनेक समस्या समोर येत आहेत. या प्रकल्पाचे ६० हजार रुपये बिल थकीत आहे.
नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात तापी नदीवर (Tapi River) दोन बॅरेजचा तयार करण्यात आले आहेत. या बॅरिजेसमुळे सिंचनाच्या मोठे सोय झाली असून, यामुळे शेती पिकांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा आहे. मात्र या प्रकल्पाकडं संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सारंगखेडा या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून वीज पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे खंडीत झाला आहे. तर इथे सुरक्षारक्षक देखील नसतो, या प्रकल्पासाठी चारशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आहे. परंतु हा प्रकल्प नेमकं कशासाठी असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तापी नदीचं पाणी महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाटेला 13TMC एवढं आहे, मात्र संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा गुजरात राज्यात जात आहे.
कुठलाही अधिकारी बोलण्यास तयार होत नाही
गेल्या दोन महिन्यापासून वीजपुरवठा खंडित नसून, सारंगखेडा या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही आहे, सीसीटीव्ही बंद पडले आहेत. अनेक समस्या समोर येत आहेत. या प्रकल्पाचे ६० हजार रुपये बिल थकीत आहे. दोन महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी देखील वेळ नाही. ऐन उन्हाळ्याच्या वेळेस पाण्याच्या समस्या उद्भवली तर पाणी कुठून कसं येणार असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता केली जात आहे. या विषयावर कुठलाही अधिकारी बोलण्यास तयार होत नाही.
108 जागांसाठी आतापर्यंत 376 अर्ज विक्री
नंदुरबार जिल्ह्यातील साही बाजार समितीच्या निवडणुका लागल्या असून, 108 जागांसाठी आतापर्यंत 376 अर्ज विक्री झाले आहेत, दोन दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने फॉर्म विक्री झाल्या असल्यामुळे, जिल्ह्यातील बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असंच काहीसं दिसून येत आहे. बाजार समिती निवडणुकीची तारीख जाहीर होता सर्वच पक्ष बैठका घेण्यात सुरुवात केली आहे. येत्या २८ एप्रिल मतदान होणार असून, तर ३१ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी तयार झाले आहेत. मात्र मतदार राजा नेमकं कोणाच्या बाजूने कौल देणार हे पहा ना आता महत्त्वाचं ठरणार आहे.