यवतमाळ – आजकालच्या सोशल मिडियाच्या युगात लग्न सोहळ्यांचा ट्रेंड पूर्णतः बदलून गेला आहे. त्यातच आताच्या मुली लग्नमंडपात शानदार एण्ट्री करू लागल्या आहेत. यवतमाळच्या शेतकऱ्याच्या मुलीने चक्क ट्रॅक्टरवरून लग्नमंडपात एण्ट्री मारली व सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. तिची ही सैराटस्टाईल एण्ट्री सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. (farmer’s daughter entry with tractor in her wedding)
राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील शेतकरी पंढरीनाथ दुर्गे यांची कन्या प्रणाली हिचा विवाह 16 फेब्रुवारी रोजी राळेगाव चंद्रपूरच्या निकेश ज्ञानेश्वर झोटिंग सोबत पार पडला. यावेळी प्रणालीने कृषी संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या ट्रॅक्टरवर स्वार होऊन लग्न मंडपात एन्ट्री घेतली. प्रणालीच्या हटके एन्ट्रीमुळे लग्नमंडपात उपस्थित वऱ्हाडी अवाक् झाले. या हटके एन्ट्रीची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा सुरु आहे.
लग्न म्हटलं की पारंपरिक वाजत गाजत वरात डोळ्यासमोर येते. नवरदेव वाजत गाजत वरात घेऊन आपल्या नववधूला घेण्यासाठी येत असे. मात्र आताच्या आधुनिक काळात या जुन्या परंपरेला फाटा देत विविध कल्पना साकारत वरात घेऊन वाजत गाजत लग्नमंडपात येण्याची परंपरा सुरु झाली आहे. कुणी हेलिकॉप्टरमधून वरात घेऊन येतं तर कुणी नाचत मंडपात येत. यात मुलीही मागे राहिल्या नाहीत. काहीतरी वेगळ करुन लग्नसोहळा अविस्मरणीय करण्याचा हल्लीच्या वधू-वरांचा प्रयत्न असतो. याआधीही हेलिकॉप्टरमधून, घोड्यावरुन नवरीची वराच लग्नमंडपात आल्याच्या घटना विवाहसोहळ्यात घडल्या आहेत. (farmer’s daughter entry with tractor in her wedding)
इतर बातम्या
कोरोना रुग्ण आढळणारी इमारत सील करणार, मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, केडीएमसीचे कठोर पावलं